भारतीय निवडणूक आयोग
azadi ka amrit mahotsav

भारत निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयुक्तांची राष्ट्रीय गोलमेज बैठक मंगळवारी होणार

Posted On: 22 FEB 2026 2:33PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 फेब्रुवारी 2026

 

  1. भारत निवडणूक आयोग मंगळवार, 24 फेब्रुवारी 2026 रोजी नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे भारत निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयुक्त यांची राष्ट्रीय गोलमेज परिषद आयोजित करणार आहे. ही गोलमेज परिषद 27 वर्षांनंतर आयोजित केली जात आहे. यापूर्वीची परिषद 1999 साली झाली होती.
  2. मुख्य निवडणूक आयुक्त श्री ज्ञानेश कुमार या परिषदेस अध्यक्षस्थानी असतील. तसेच निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंह संधू आणि डॉ. विवेक जोशी हेही उपस्थित राहतील.
  3. या परिषदेत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे राज्य निवडणूक आयुक्त त्यांच्या कायदेविषयक आणि तांत्रिक तज्ज्ञांसह सहभागी होणार आहेत. तसेच सर्व 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) देखील परिषदेत सहभागी होतील.
  4. या गोलमेज परिषदेचा मुख्य उद्देश निवडणूक प्रक्रिया आणि व्यवस्थापनासंदर्भात, आपापल्या कायदेशीर चौकटीत राहून ईसीआय आणि राज्य निवडणूक आयुक्त (एसईसी) यांच्या कार्यपद्धतीत समन्वय वाढवणे हा आहे. या चर्चेमुळे रचनात्मक विचारांची देवाणघेवाण होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होईल आणि निवडणूक व्यवस्थापनात सहकारी संघराज्यवादाची भावना अधिक दृढ होईल, अशी अपेक्षा आहे.
  5. दिवसभर चालणाऱ्या या परिषदेत निवडणूक प्रक्रिया अधिक सक्षम करण्याबरोबरच तंत्रज्ञानाचा वापर, ईव्हीएम आणि मतदार यादींची देवाणघेवाण यांसारख्या विषयांवर चर्चा होणार आहे.
  6. आयोगाचे वरिष्ठ अधिकारी अलीकडेच सुरू करण्यात आलेल्या ईसीआयएनइटी या डिजिटल प्लॅटफॉर्मविषयी तसेच निवडणूक सेवा सुलभ आणि सुव्यवस्थित करण्याच्या दृष्टीने त्याच्या परिवर्तनकारी क्षमतेबाबत प्रमुख तांत्रिक आणि कार्यकारी उपक्रमांवर सादरीकरण करतील.
  7. या सादरीकरणांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे यांची बळकटी, पारदर्शकता आणि सुरक्षा उपाययोजनांविषयीही माहिती दिली जाईल.
  8. जन प्रतिनिधित्व अधिनियम, 1950 च्या संदर्भात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनुसार मतदार पात्रतेवर तुलनात्मक सादरीकरण करण्यात येईल, ज्यामुळे विविध अधिकार क्षेत्रांमध्ये मतदार यादी तयार करण्यासंबंधीच्या कायदेशीर चौकटीवर माहितीपूर्ण चर्चा सुलभ होईल.
  9. राज्य निवडणूक आयोगांची स्थापना संबंधित राज्यांच्या कायद्यांनुसार, 73 व्या आणि 74 व्या घटनादुरुस्तींद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांच्या तरतुदींनुसार करण्यात येते. भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 243 के आणि 243 झेड ए अंतर्गत पंचायत आणि नगरपालिकांच्या सर्व निवडणुकांसाठी मतदार यादी तयार करणे आणि निवडणुका घेण्याची जबाबदारी राज्य निवडणूक आयुक्तांवर सोपविण्यात आली आहे.

 

* * *

नेहा कुलकर्णी/राज दळेकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2231469) अभ्यागत कक्ष : 24