पंतप्रधान कार्यालय
क्वालकॉम इंक.चे अध्यक्ष आणि सीईओ यांनी पंतप्रधानांची भेट घेतली
Posted On:
20 FEB 2026 9:12PM by PIB Mumbai
क्वालकॉम इंक.चे अध्यक्ष आणि सीईओ क्रिस्टियानो आर. आमोन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधानांनी भारताच्या नवोन्मेषी आणि स्टार्टअप्सच्या चैतन्यशील परिसंस्थेवर प्रकाश टाकला. त्यांनी सेमीकंडक्टर्स आणि चिप उत्पादनाच्या जगात एकत्रितपणे काम करण्यावरही चर्चा केली.
X वरील पोस्टमध्ये मोदी म्हणाले:
“क्वालकॉम इंक. चे अध्यक्ष आणि सीईओ क्रिस्टियानो आर. आमोन यांना भेटून आनंद झाला. एआय आणि तंत्रज्ञानाच्या इतर भविष्यकालीन क्षेत्रांमध्ये क्वालकॉम भारतीय नवोन्मेषक आणि स्टार्टअप्सबरोबर कसे काम करू शकते यावर आम्ही चर्चा केली. सेमीकंडक्टर्स आणि चिप उत्पादनाच्या जगात एकत्रितपणे काम करण्याबाबतही आम्ही चर्चा केली.
@Qualcomm
@cristianoamon"
***
शैलेश पाटील/राजश्री आगाशे/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2231126)
अभ्यागत कक्ष : 9