पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेत आयोजित मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या गोलमेज बैठकीत जबाबदार एआयसाठी जागतिक वचनबद्धता केली अधोरेखित
Posted On:
19 FEB 2026 11:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी 2026
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेत झालेल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या गोलमेज बैठकीतील निष्कर्षांचे स्वागत केले. या बैठकीत कृत्रिम बुद्धिमत्ता, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाच्या जगातील आघाडीचे भागधारक सहभागी झाले होते.
बैठकतील चर्चा अंतर्दृष्टीपूर्ण आणि दूरदर्शी होत्या, ज्यात एआयचा अधिक जबाबदारीने विकास करण्यावर, जागतिक सहकार्याला बळकटी देण्यावर तसेच विकासाच्या संधी खुल्या करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले.
मानवी प्रगती आणि शाश्वत विकासासाठी एआयचा वापर करण्याच्या सामायिक वचनबद्धतेचे साक्षीदार होणे आनंददायी असल्याचे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले.
एक्स या समाज माध्यमावरील एका संदेशात पंतप्रधान म्हणाले:
“एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेतील सीईओ राउंडटेबलने एआय, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाच्या जगातील विविध भागधारकांना एकत्र आणले. चर्चा अंतर्दृष्टीपूर्ण आणि दूरदर्शी होत्या, ज्यात एआयचा अधिक जबाबदारीने विकास करण्यावर, जागतिक सहकार्याला बळकटी देण्यावर आणि विकासाच्या संधी खुल्या करण्यावर लक्ष केंद्रित केले गेले.
मानवी प्रगती आणि शाश्वत विकासासाठी एआयचा वापर करण्याच्या सामायिक वचनबद्धतेचे साक्षीदार होणे आनंददायी होते.”
सोनाली काकडे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
(Release ID: 2230550)
अभ्यागत कक्ष : 13