संरक्षण मंत्रालय
मिलन 2026 : संरक्षणमंत्र्यांची आसियानच्या 9 सदस्य राष्ट्रांच्या नौदल प्रमुख व प्रतिनिधीमंडळांशी चर्चा
प्रविष्टि तिथि:
19 FEB 2026 10:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी 2026
मिलन 2026 या नौदल सरावाच्या निमित्ताने संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी 19 फेब्रुवारी 2026 रोजी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे आसियानच्या 9 सदस्य राष्ट्रांच्या नौदल प्रमुख व प्रतिनिधीमंडळांशी चर्चा केली.
संरक्षणमंत्र्यांनी मिलन 2026 मध्ये आसियान देशांच्या नौदलांच्या लक्षणीय सहभागाचे स्वागत केले. 1995 मध्ये 4 परदेशी नौदलांच्या सहभागाने सुरू झालेल्या या सरावाने फेब्रुवारी 2026 मध्ये 74 राष्ट्रांच्या सहभागासह आतापर्यंतचा सर्वात मोठा विस्तार साधला असल्याचे त्यांनी नमूद केले.
राजनाथ सिंह यांनी आसियानला भारताच्या हिंद-प्रशांत धोरणाचा प्रमुख स्तंभ संबोधत सामायिक सुरक्षा हा प्रादेशिक समृद्धीचा भक्कम पाया असल्याचे स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमांमुळे परिपक्व झालेल्या भारताच्या संरक्षण तंत्रज्ञान व्यवस्थेचा लाभ आसियान भागीदारांनी घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले. स्वदेशी विमानवाहू नौका आयएनएस विक्रांत आणि विशाखापट्टणम श्रेणीतील विध्वंसक नौका या भारताच्या ‘निर्माता नौदल’ या रूपांतरणाचे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले.
2025 च्या उत्तरार्धात झालेल्या भारत-आसियान अनौपचारिक बैठकीतील भावना पुन्हा व्यक्त करत आसियान प्रतिनिधींनी या प्रदेशात प्रथम प्रतिसाद देणाऱ्या देशाच्या भूमिकेत भारताने बजावलेल्या कार्याचे कौतुक केले. दीर्घकालीन सागरी स्थैर्य सुनिश्चित करण्यासाठी आसियान-भारत संरक्षण चिंतन संस्था संवाद तसेच तरुण नौदल अधिकाऱ्यांच्या सहभागासंदर्भातील संयुक्त उपक्रम विस्तारण्याचा प्रस्ताव संरक्षणमंत्र्यांनी मांडला.
‘मैत्रीभाव, सहकार्य आणि सहयोग’ या मिलन 2026 च्या अधिकृत संकल्पनेच्या आधारे मुक्त, खुला आणि सर्वसमावेशक हिंद-प्रशांत क्षेत्राच्या सामायिक बांधिलकीचा संकल्प करत ही बैठक संपन्न झाली.
HVK5.jpeg)
(रिलीज़ आईडी: 2230545)
आगंतुक पटल : 104