गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा उद्या आसाममधील काचर जिल्ह्यातील नाथनपूर गावात व्हायब्रंट व्हिलेजेस (व्हीव्हीपी-II) उपक्रमांच्या दुसऱ्या टप्प्याचा करणार शुभारंभ


सीमावर्ती समुदाय संरक्षित, शाश्वत आणि समृद्ध करण्यासाठी सुसंगतपणे विकसित भारत @2047 याअंतर्गत प्रोत्साहन देण्यावर या उपक्रमाचा भर आहे

स्थानिक रहिवाशांना सीमा संरक्षण बहाल करत, दक्षता घेऊन सीमापार गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यात, हा उपक्रम महत्त्वपूर्ण योगदान देत सक्षम करतो

15 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमध्येही योजना कार्यान्वित होणार असून संतृप्तता-आधारित आणि अभिसरण-चालित दृष्टिकोनाद्वारे राबविली जाणार आहे. व्हीव्हीपी-II या योजनेसाठी 6839 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे

Posted On: 19 FEB 2026 6:31PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी 2026

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह उद्या आसाममध्ये व्हायब्रंट व्हिलेजेस या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याचा -II (व्हीव्हीपी-II) शुभारंभ करतील, जो सीमावर्ती गावांना बळकट करण्यासाठी आणि सीमावर्ती भागातील समावेशक विकासाला चालना देण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. हा कार्यक्रम औपचारिक रितीने  शुक्रवार, 20 फेब्रुवारी 2026 रोजी कछार जिल्ह्यातील नाथनपूर या गावापासून सुरू होईल.

व्हायब्रंट व्हिलेजेस प्रोग्राम-II हा अभिसरण-चलित उपक्रम असून संपूर्णपणे लाभ मिळवून देण्याचा दृष्टिकोन बाळगून सीमावर्ती गावांचा व्यापक आणि शाश्वत विकास सुनिश्चित करण्यासाठी डिझाइन केलेला आहे. हा उपक्रम आवश्यक पायाभूत सुविधा सुधारण्यावर, तसेच मूलभूत सेवांमधील प्रवेश वाढविण्यात आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी निर्माण करण्यावर लक्ष केंद्रीत करतो, ज्यामुळे सीमावर्ती समुदायांना विकसित भारत @2047 च्या दृष्टीकोनाशी सुसंगतपणे    संरक्षण, शाश्वती आणि समृद्धीसाठी प्रोत्साहन मिळते

अशा गावांचे सबलीकरण करून, हा कार्यक्रम तेथील रहिवाशांना अतिशय दक्ष रहाण्यास (राष्ट्राचे डोळे आणि कान म्हणून कार्यरत होण्यासाठी) सक्षम करतो,ज्यामुळे सीमा सुरक्षा वाढते सीमापार गुन्ह्यांना प्रतिबंध होतो आणि अंतर्गत सुरक्षा मजबूत करण्यात महत्त्वपूर्ण योगदान मिळते.

व्हायब्रंट व्हिलेजेस प्रोग्राम-II ही केंद्रीय क्षेत्रीय  योजना आहे ज्याचा खर्च 2028-29 या आर्थिक वर्षापर्यंत 6839 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे आहे. व्हीव्हीपी-II ही योजना 15 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये राबविली जाणार आहे.


नितीन फुल्लुके/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर
 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 
 

 


(Release ID: 2230347) अभ्यागत कक्ष : 8