इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav AI Impact Summit 2026

भारतातील लोकसंख्येच्या स्तरावर प्रभाव पाडणाऱ्या 110 पेक्षा जास्त कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान विषयक स्टार्टअप्सची माहिती असलेल्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन

Posted On: 19 FEB 2026 9:07AM by PIB Mumbai

इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 शिखर परिषदेच्या निमित्ताने इंडियाज एआय इम्पॅक्ट स्टार्टअप्स या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तिकेते लोकसंख्येच्या स्तरावर सामाजिक आणि आर्थिक प्रभाव पाडणाऱ्या 110 स्टार्टअप्स आणि ना नफा तत्वावर चालणाऱ्या संस्थांची माहिती आहे. इंडिया एआय आणि कल्पा इम्पॅक्ट या संस्थांनी ही पुस्तिका प्रकाशित केली आहे. या माहिती पुस्तिकेमध्ये आरोग्यसेवा, कृषी, शिक्षण, हवामान, आर्थिक समावेशन, शहरी दळणवळणीय व्यवस्था, आणि सार्वजनिक सेवा वितरण यांसारख्या विविध क्षेत्रांचा समावेश आहे.

भारतातील एआय फॉर इम्पॅक्ट अर्थात प्रभाव घडवून आणण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक परिसंस्थेचे हे अशाप्रकारचे पहिलेच नियोजनबद्ध मॅपिंग आहे. भारतीय संस्थापक, स्थानिक गरजांनुसार आणि त्याचवेळी जगाशी सुसंगत असलेल्या उपाययोजनांना कशारितीने आकार देत आहेत, याचे दस्तऐवजीकरण या या पुस्तिकेत केले केले आहे. देशातली ही कृत्रिम बुद्धिमत्ताविषयक परिसंस्था एकाच वेळी प्रयोगही करत आहे, तसेच व्यवस्थेचे बळकटीकरण करण्याचे कामही करत असल्याचे निरीक्षण, या पुस्तिकेतील या विश्लेषणामध्ये मांडण्यात आले आहे. यात प्रामुख्याने आवाजाशी संबंधित कृत्रिम बुद्धिमत्ताधारीत उपाययोजना आणि स्थानिक भाषांमधील इंटरफेस, हे वंचित घटकांपर्यंत पोहण्याची प्राथमिक साधने ठरली असल्याचे या विश्लेषणात म्हटले आहे. याशिवाय मेड-इन-इंडिया अंतर्गतच्या पायाभूत प्रारुपांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचेही या विश्लेषणात म्हटलं आहे. धोरणकर्त्यांसाठी ही पुस्तिका कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानातील एकात्मिकतेसाठी सज्ज असलेल्या क्षमतांविषयीची संदर्भ पुस्तिका म्हणून उपयुक्त ठरेल. तर गुंतवणूकदारांसाठी तंत्रज्ञानाच्यादृष्टीने व्यवहार्य आणि व्याप्ती वाढवण्यायोग्य उपक्रमांची निश्चिती करण्यासाठी ही पुस्तिका कामी येणार आहे. तर जगाचा विचार करता ग्लोबल साऊथअंतर्गतच्या देशांमधील अनुकरणीय प्रारुपांविषयी समजून घेण्यासाठी ही पुस्तिका उपयुक्त ठरणार आहे.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव, राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राचे (NIC) महासंचालक आणि इंडिया एआय मिशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक सिंह यावेळी उपस्थित होते. या निमित्ताने त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. भारतातील प्रभाव पाडणाऱ्या 100 पेक्षा जास्त स्टार्टअप्स आणि ना नफा तत्त्वावर चालणाऱ्या संस्थांची माहिती ( India's AI Impact Startups: Repository of 100+ Startups and Non-Profits ) असलेली ही पुस्तिका म्हणजे, संबंधित भागधारकांना सार्वजनिक ध्येय उद्दिष्टांना अनुसरून असलेल्या उपक्रमांची एक नियोजनबद्ध रूपरेषा देणारे व्यावहारिक संदर्भ साधन असल्याचे त्यांनी सांगितले. धोरणकर्त्यांना या पुस्तिकेतून विद्यमान डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांसोबत एकात्मिकता घडवून आणण्यासाठी सज्ज असलेल्या क्षमतांविषयी समजून घेता येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यासोबतच उद्योग आणि गुंतवणूकदारांसाठी, तंत्रज्ञानाच्या बाबतीत व्यावहारिक, व्याप्तीचा विस्तार करताय येईल अशा आणि दीर्घकालीन क्षमतेच्या उपक्रमांविषयीची माहिती या पुस्तिकेतून मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. एकूणात ही पुस्तिका म्हणजे माहितीपूर्ण संवाद, सहभाग या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याला पाठबळ देणारी एक सर्वंकष संदर्भ पुस्तिका ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

इंडिया एआय मिशनचे मोहम्मद वाय. सफीरुल्ला के (भारतीय प्रशासकीय सेवा) यांनीही उपस्थितांशी संवाद साधला. भारताची कृत्रिम बुद्धिमत्ता परिसंस्था वेगाने प्रगल्भ होत आहे असे ते म्हणाले. या माहिती पुस्तिकेतून भारतीय स्टार्टअप्स आता आश्वासक प्रायोगिक प्रकल्पांचा टप्पा ओलांडून ते प्रत्यक्ष अमलात आणण्याच्या दिशेने पुढे जात असल्याच्या, तसेच लाखो लोकांसाठी अमलात आणल्या गेलेल्या व्यापक उपाययोजनांविषयक महत्वाच्या घडामोडींचे दस्तऐवजीकरण गेले असल्याचे त्यांनी सांगितले. या परिसंस्थेची जोपासना करण्यासाठी इंडिया एआय मिशन वचनबद्ध आहे, या पुस्तिकेतून संबंधितांना नेमका कुठे कुठे प्रभाव पडला आहे याची माहिती मिळते असे ते म्हणाले. 

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सरव्यवस्थापक (स्टार्टअप्स) अंशुल सिंघल यांनीही आपली मते व्यक्त केली. या पुस्तिकेत सोडवल्या गेलेल्या समस्यांमधील विविधता हे या माहिती पुस्तिकेचे वैशिष्ट्य असल्याचे त्यांनी सांगितले. न्यायालयातील लिप्यंतरणापासून ते ग्रामीण आरोग्य तपासणी आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठीच्या सल्लामसलतीपर्यंत अनेक मुद्यांचा यात अंतर्भाव असल्याचे ते म्हणाले. भारतातील कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक स्टार्टअप्स केवळ ॲप्लिकेशन्स तयार करत नाहीत, तर ते सर्वांच्या समावेशनासाठीच्या पायाभूत सुविधांची उभारणी करत असल्याची बाब त्यांनी नमूद केली.

कल्पा इम्पॅक्टचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुशांत कुमार म्हणाले यांनीही उपस्थितांशी संवाद साधला भारतातील कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक स्टार्टअपची परिसंस्था ही सुपर युटिलिटी अर्थात परिपूर्ण उपयुक्तता या तत्वावर भर देत काम करत आहे, आणि त्यादृष्टीनेच मानवी गरजा आणि सार्वजनिक सेवा क्षेत्रातील आव्हानांवर मात करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रत्यक्ष वापर करण्यावर भर देत आहे असे त्यांनी सांगितले. सध्या विकासाच्या टप्प्यावर असलेल्या बहुतांश कंपन्यांनी याआधीच आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःचा विस्तार केला असून, त्या भारताला उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमधील कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक उत्पादनांचे निर्यात केंद्र म्हणून प्रस्थापित करत असल्याचे आपल्या विश्लेषणात आढळून आले असल्याचेही त्यांनी नमूद केले. इंटरनेटशिवाय चालणाऱ्या एज एआय सारख्या उपाययोजना असोत अथवा स्थानिक बोलीभाषांचा वापर करू शकणारे व्हॉइस बॉट्स असोत, भारतीय संस्थापक या प्रदेशासमोरच्या आणि त्याचवेळी जगालाही लागू असतील अपवादात्मक आव्हानांवरच्या पूर्ण क्षमताबद्ध उपाययोजना तयार करत असल्याचेही त्यांनी सांगितले. 

कल्पा इम्पॅक्ट च्या चमून या माहिती पुस्तिकेसाठीचे संशोधन आणि पुस्तिकेचे संकलन केले आहे.

ही माहितीपुस्तिका https://d19ob9sqegt2wc.cloudfront.net/stage/uploads/India_s_AI_Impact_Startups_Compendium_Report_Design_For_Web_4089ae98f7.pdf या दुव्यावर उपलब्ध आहे.

***

Nehakulkarni/TusharPawar/DineshYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2230142) अभ्यागत कक्ष : 15