पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav AI Impact Summit 2026

स्पेनचे राष्‍ट्राध्यक्ष पेड्रो सांचेझ भारत दौ-यावर

Posted On: 18 FEB 2026 7:53PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 फेब्रुवारी 2026

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून, स्पेनचे राष्‍ट्राध्यक्ष पेड्रो सांचेझ 18 आणि 19 फेब्रुवारी असे दोन दिवस ‘इंडिया एआय इम्पॅक्ट’ शिखर परिषद- 2026 मध्ये सहभागी होण्यासाठी भारताच्या अधिकृत दौऱ्यावर आले आहेत. याआधी 27 ते 29 ऑक्टोबर, 2024 या दरम्यान झालेल्या त्यांच्या द्विपक्षीय भेटीनंतर, त्यांचा हा दुसरा अधिकृत भारत दौरा आहे. त्यांच्याबरोबर  डिजिटल परिवर्तन आणि नागरी सेवा  मंत्री  ऑस्कर लोपेझ अगुएडा आणि स्पेनचे कृषी, मत्स्यव्यवसाय तसेच अन्न मंत्री लुईस प्लानस पुचाडेस् हेही भारत भेटीवर आले आहेत.

पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती सांचेझ यांनी द्विपक्षीय चर्चा केली आणि व्यापार आणि गुंतवणूक, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, हवामान आणि अक्षय ऊर्जा, संरक्षण आणि सुरक्षा, अवकाश, संस्कृती, पर्यटन आणि थेट लोकांचा लोकांशी असलेला संवाद तसेच  देवाणघेवाण यासह विविध क्षेत्रांमध्‍ये  भारत-स्पेन संबंधांविषयी क्षेत्रांचा उभय नेत्यांनी आढावा घेतला. याप्रसंगी  नेत्यांनी द्विपक्षीय सहकार्यातील सकारात्मक गतीचे स्वागत केले आणि ऑक्टोबर 2024  मध्ये या दोन्‍ही नेत्यांनी संयुक्तपणे उद्घाटन केलेल्या  बडोदे येथील  सी -295 वाहतूक विमानासाठी  जुळणीविषयक कामासंबंधी टाटा-एअरबस सहकार्यातील प्रगतीबद्दल आनंद व्यक्त केला. त्यांनी सह-विकास आणि सह-उत्पादनावर आधारित संरक्षण औद्योगिक सहकार्य असेच यापुढेही सुरू ठेवण्‍यावर भर दिला.

उभय  नेत्यांनी भारत-स्पेन संस्कृती, पर्यटन आणि कृत्रिम प्रज्ञेच्या दोन  वर्षाच्या उच्च क्षमतेवर भर दिला.  यावर्षी दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधांच्या स्थापनेचा 70 वा वर्धापन दिनानिमित्त साजरा केला जात आहे. त्यामुळे द्विपक्षीय तंत्रज्ञान, नवोपक्रम, व्यवसाय आणि थेट लोकांमध्‍ये संबंध प्रस्थापित होण्‍यास  आणखी चालना मिळेल, असे मत व्यक्त केले.

स्पेनचे राष्‍ट्राध्यक्ष सांचेझ यांनी ‘एआय इम्पॅक्ट’ शिखर परिषदेचे महत्त्व अधोरेखित केले आणि विश्वास व्यक्त केला की, या परिषदेचा परिणाम वैश्विक एआय प्रशासनाला आकार देण्यासाठी  होईल.  दोन्ही नेत्यांनी कृत्रिम प्रज्ञा ही परिवर्तनकारी शक्ती म्हणून ओळखली जात असून,  समावेशक विकास आणि सामाजिक फायद्यासाठी या प्रचंड क्षमतेचा वापर करण्यासाठी भारत-स्पेन यांच्यामध्‍ये  सहकार्य करण्‍याची  गरज आहे, यावर  भर दिला.

याप्रसंगी बोलताना उभय नेत्यांनी  शिक्षण क्षेत्रात सहकार्याच्या क्षमतेवरही  चर्चा केली.  विशेषतः भारताच्या नवीन शैक्षणिक  धोरणाच्या संदर्भात, त्यांनी 19 आणि 20 फेब्रुवारी 26  रोजी नवी दिल्ली येथे होणाऱ्या भारतीय विद्यापीठांच्या कुलगुरू आणि स्पॅनिश विद्यापीठांमध्‍ये असलेल्या  रेक्टरांच्या परिषदेचे स्वागत केले. दोन्ही नेत्यांनी दोन्ही देशांमध्‍ये  पर्यटनात सतत प्रभावी वाढ होत असल्याचे नमूद केले. तसेच त्यामुळे या दोनही  देशांमध्ये मोठ्या  प्रमाणावर आर्थिक उलाढाल होण्‍यास हातभार लागत आहे आणि लोकांचे संबंध आणखी दृढ होत आहेत, यावर दोन्‍ही नेत्यांनी सहमती व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन शिक्षण धोरणांतर्गत आघाडीच्या स्पॅनिश विद्यापीठांना  आणि  ‘स्टेम’ तसेच  तंत्रज्ञान क्षेत्रातील संस्थांना,  भारतात शैक्षणिक परिसर सुरू करण्‍यासाठी आमंत्रित केले.

दोन्ही नेत्यांनी इंडो-पॅसिफिक महासागर उपक्रमात सामील होण्याच्या स्पेनच्या निर्णयासह परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचार विनिमय केला. त्यांनी भारत- युरोपीय संघ मुक्त व्यापार करार  वाटाघाटींबाबत  कौतुक केले. भारत आणि स्पेन तसेच युरोपमधील प्रचंड व्यापार आणि गुंतवणूक क्षमतांचा वापर करण्‍यासाठी या कराराची मदत होणार आहे. त्यांनी सर्व प्रकारच्या आणि प्रकट दहशतवादाचा तीव्र निषेध केला आणि दहशतवादाचा सामना  करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य मजबूत करण्याच्या गरजेवर भर दिला.

उभय नेत्यांनी विश्वास व्यक्त केला की, या व्दि-वर्षाच्या माध्यमातून द्विपक्षीय संबंधांचा विस्तार होत असल्याने भारत-स्पेन भागीदारीला नवीन गती मिळेल.

 

* * *

शैलेश पाटील/सुवर्णा बेडेकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2229960) अभ्यागत कक्ष : 12