पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली क्रोएशियाच्या पंतप्रधानांची भेट
Posted On:
18 FEB 2026 7:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी 2026
क्रोएशियाचे पंतप्रधान आंद्रेज प्लेन्कोविच यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
दोन्ही नेत्यांनी तंत्रज्ञान, नवोन्मेष, जहाजबांधणी, नील अर्थव्यवस्था आणि आयएमईईसी कॉरिडॉरद्वारे कनेक्टिव्हिटी वाढवणे यासारख्या क्षेत्रात आपल्या द्विपक्षीय भागीदारीला चालना देण्याच्या मार्गांवर चर्चा केली.
एक्स या समाज माध्यमावरील वेगवेगळ्या संदेशात पंतप्रधानांनी लिहिले:
“क्रोएशियाचे पंतप्रधान श्री आंद्रेज प्लेन्कोविच यांच्याशी फलदायी चर्चा झाली. तंत्रज्ञान, नवोन्मेष, जहाजबांधणी, नील अर्थव्यवस्था आणि आयएमईईसी कॉरिडॉरद्वारे कनेक्टिव्हिटी वाढवणे यासारख्या क्षेत्रात आपल्या द्विपक्षीय भागीदारीला कशी चालना देता येईल यावर आम्ही चर्चा केली. भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार कराराला त्यांनी दिलेल्या वैयक्तिक पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. हा करार भारत तसेच युरोपमधील नागरिकांची अभूतपूर्व प्रगती घडवून आणेल.
@AndrejPlenkovic”
“Održao sam produktivan razgovor s predsjednikom Vlade Republike Hrvatske, g. Andrejem Plenkovićem. Razmotrili smo mogućnosti dodatnog osnaživanja našeg bilateralnog partnerstva, s posebnim naglaskom na produbljivanje suradnje u područjima tehnologije, inovacija, brodogradnje te razvoja plavog gospodarstva, kao i na unapređenje povezanosti kroz koridor IMEEC. Posebno sam izrazio zahvalnost na njegovoj osobnoj potpori sklapanju Sporazuma o slobodnoj trgovini između Indije i Europske unije (India–EU FTA), koji će omogućiti daljnji razvoj za građane Indije i Europe.
@AndrejPlenkovic”
* * *
शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2229954)
अभ्यागत कक्ष : 9
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam