उपराष्ट्रपती कार्यालय
भारतरत्न कर्पूरी ठाकूर यांच्या पुण्यतिथीनिमित्त उपराष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
Posted On:
17 FEB 2026 12:01PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी 2026
उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांनी आज नवी दिल्लीतील उपराष्ट्रपती भवन येथे भारतरत्न कर्पूरी ठाकूर यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली.
समाज माध्यमावरील संदेशात उपराष्ट्रपतींनी कर्पूरी ठाकूर यांचे वर्णन एक खरे 'जन नायक' असे केले. ठाकूर यांनी आपले संपूर्ण जीवन सामाजिक न्याय, वंचितांचे सक्षमीकरण आणि सार्वजनिक सेवेसाठी समर्पित केले, असेही ते म्हणाले.
ठाकूर यांचा साधेपणा, सचोटी आणि उपेक्षितांच्या उन्नतीसाठी अखंड बांधिलकी देशाला प्रेरणा देत आहे आणि आपल्या लोकशाही मूल्यांना बळकटी देत आहे, असेही उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
नितीन फुल्लुके /श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2229027)
अभ्यागत कक्ष : 8