पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांची पीटीआय मुलाखतीत अर्थसंकल्प, सुधारणा आणि भारताच्या विकासगाथेबद्दल सखोल माहिती

प्रविष्टि तिथि: 16 FEB 2026 12:01PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया या वृत्तसंस्थेला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत भारताच्या आर्थिक आणि विकासात्मक मार्गाला आकार देणाऱ्या विविध मुद्द्यांवर आपला दृष्टिकोन मांडला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाविषयी बोलताना सर्वसमावेशक विकासाला चालना देण्यातील अर्थसंकल्पाची भूमिका आणि जागतिक अर्थव्यस्थेतील भारताचे सामर्थ्यशाली स्थान अधोरेखित केले. त्यांनी पारदर्शकता, कार्यक्षमता आणि स्पर्धात्मकता वाढवणाऱ्या संरचनात्मक सुधारणांबद्दल सरकारची वचनबद्धता अधोरेखित करून “सुधारणा एक्सप्रेस” च्या गतीवर भर दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये लिहिले आहे:

"पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मी या वर्षीचा अर्थसंकल्प, सुधारणा एक्स्प्रेस, जग भारतासोबत व्यवसाय का करू इच्छिते, सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांसाठी रालोआ सरकार करत असलेले प्रयत्न, स्टार्टअप्स, संरक्षणावरील भर आणि बरेच काही अशा विविध मुद्द्यांवर आपले विचार मांडले आहेत."

***

NitinFulluke / BhaktiSontakke / DineshYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2228646) आगंतुक पटल : 72
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Bengali , Telugu , Gujarati , English , Urdu , हिन्दी , Bengali-TR , Assamese , Manipuri , Punjabi , Odia , Tamil , Kannada , Malayalam