गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी गुजरातची राजधानी गांधीनगर येथे 'सेंट्रल बँक डिजिटल करन्सी' (CBDC) आधारित सार्वजनिक वितरण प्रणालीचा केला शुभारंभ
प्रविष्टि तिथि:
15 FEB 2026 3:51PM by PIB Mumbai
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज गुजरात मधील गांधीनगर येथे 'सेंट्रल बँक डिजिटल करन्सी' (CBDC) आधारित एक पारदर्शक, आधुनिक आणि सुलभ सार्वजनिक वितरण प्रणालीचा शुभारंभ केला.

आपल्या भाषणात केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्यापासून प्रेरणा घेऊन 'डिजिटल इंडिया'चा विस्तार आता अन्न आणि पुरवठा प्रणालीपर्यंत होत आहे. ही प्रणाली गरिबांना रेशन देण्याच्या यंत्रणेतून भ्रष्टाचार पूर्णपणे नष्ट करेल, असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला.
देशभरातील संपर्कव्यवस्थेच्या विस्तारामुळे, आता गरिबांना डिजिटल माध्यमांद्वारे थेट अन्नधान्य मिळावे याची खात्री करण्यासाठी आवश्यक व्यवस्था केली जाईल, असे अमित शाह यांनी सांगितले.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, तंत्रज्ञान आणि पंतप्रधान मोदीजींची गरिबांप्रति असलेली संवेदनशीलता यांचा हा अनोखा संगम असलेली वितरण प्रणाली, सुरक्षित आणि पारदर्शक पद्धतीने गरिबांच्या हक्कांचे रक्षण करण्याचे साधन बनेल. त्यांनी नमूद केले की, आज 'अन्नपूर्णा' मशीनचेही उद्घाटन करण्यात आले, जी अवघ्या 35 सेकंदात 25 किलो अन्नधान्य वितरित करते. ही प्रणाली पुढील 3-4 वर्षांत संपूर्ण देशात लागू केली जाईल. ही अन्नधान्य वितरण प्रणाली पूर्णपणे पारदर्शक असेल आणि तिच्या अंमलबजावणीनंतर देशातील प्रत्येक गरीब व्यक्तीला 5 किलो मोफत अन्नधान्य मिळू शकेल, अशी माहिती शाह यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, 'अन्नपूर्णा' मशीनमुळे उत्तम दर्जा, अचूक प्रमाण आणि पारदर्शक वितरण सुनिश्चित होण्यास मदत होईल. हळूहळू ही प्रणाली आपल्या विशाल देशात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि द्वारकेपासून कामाख्यापर्यंत लागू केली पाहिजे, अशी अपेक्षा शाह यांनी व्यक्त केली.

आज अन्न वितरण आणि अन्न सुरक्षेतील भ्रष्टाचार आणि पारदर्शकतेचा अभाव दूर झाला आहे, असे केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले. यामुळे प्रत्येक गरीब नागरिकाचा अन्नाचा अधिकार सुनिश्चित होईल आणि मध्यस्थांसाठी कोणतीही जागा उरणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
***
सुषमा काणे/शैलेश पाटील/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2228426)
आगंतुक पटल : 105
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam