पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आसाममधील दिब्रुगड इथे ईशान्य भारतातील पहिल्या आपत्कालीन लँडिंग सुविधेचे (ELF) उद्घाटन

प्रविष्टि तिथि: 14 FEB 2026 7:29PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज आसाममधील दिब्रुगड इथे ईशान्य भारतातील पहिल्या आपत्कालीन लँडिंग सुविधेचे (Emergency Landing Facility - Elf - आपत्कालीन परिस्थितीत विमानं उतरवण्याच्या धावपट्ट्या) उद्घाटन झाले. ईशान्य भारताला अशी आपत्कालीन लँडिंग सुविधा मिळणे ही अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. धोरणात्मक दृष्टिकोनातून आणि नैसर्गिक आपत्तीच्या काळात ही सुविधा अत्यंत महत्त्वाची असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

 या संदर्भात पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर सामायिक केलेला संदेश :

ईशान्य भारताला पहिली आपत्कालीन लँडिंग सुविधा मिळणे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. धोरणात्मक दृष्टिकोनातून आणि नैसर्गिक आपत्तींच्या काळाच्या अनुषंगाने ही सुविधा अत्यंत महत्त्वाची आहे.

"উত্তৰ-পূৰ্বাঞ্চলে ইমাৰ্জেঞ্চি লেণ্ডিং ফেচিলিটি লাভ কৰাটো অপৰিসীম গৌৰৱৰ বিষয়।  কৌশলগত দৃষ্টিকোণৰ পৰা আৰু প্ৰাকৃতিক দুৰ্যোগৰ সময়ত এই সুবিধাৰ গুৰুত্ব অতিশয় বেছি।"

***

शैलेश पाटील/गजेंद्र देवडा/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2228280) आगंतुक पटल : 69
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Bengali-TR , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam