गृह मंत्रालय
पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील हुतात्मा सैनिकांच्या शौर्याचे स्मरण करत केंद्रिय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांची सैनिकांना आदरांजली
दहशतवाद हा मानवतेचा सर्वात मोठा शत्रू आणि भारत त्याच्या समूळ उच्चाटनासाठी कटीबद्ध
दहशतवादाचा मुकाबला करणारी आपली सुरक्षा दले आणि सुरक्षा यंत्रणांच्या शौर्य, समर्पण व त्यागाच्या देश सदैव ऋणात राहील
प्रविष्टि तिथि:
14 FEB 2026 10:23AM by PIB Mumbai
केंद्रिय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या शौर्याचे स्मरण केले आणि त्यांना आदरांजली वाहिली.
एक्स माध्यमावरील संदेशात केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे की, पुलवामा दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या शूरांचे मी स्मरण करतो आणि त्यांना आदरांजली अर्पण करतो. ते म्हणाले की दहशतवाद हा मानवतेचा सर्वात मोठा शत्रू आहे आणि भारत त्याच्या समूळ उच्चाटनासाठी कटीबद्ध आहे. अमित शहा म्हणाले की दहशतवादाचा सामना करणाऱ्या आपल्या सुरक्षा दलांचा आणि सुरक्षा यंत्रणांचे शौर्य, त्याग, तसेच समर्पण यांच्या ऋणात देश सदैव राहील.
***
हर्षल आकुडे/सुरेखा जोशी/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2228161)
आगंतुक पटल : 42
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam