पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

बांगलादेशातील संसदीय निवडणुकीत बीएनपीला मिळालेल्या विजयाबद्दल पंतप्रधानांनी केले तारिक रहमान यांचे अभिनंदन

Posted On: 13 FEB 2026 12:13PM by PIB Mumbai

 

बांगलादेशात संसदीय समितीत बीएनपीला निर्णायक विजय मिळाल्याबद्दल नरेंद्र मोदी यांनी तारिक रहमान यांचे अभिनंदन केले. लोकसत्ताक, प्रगतीशील आणि सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन देणाऱ्या बांगलादेशला भारताचे समर्थन असेल, असे  मोदींनी म्हटले आहे. "आमचे बहुआयामी संबंध मजबूत करण्यासाठी आणि आमची समान विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी मी तुमच्यासमवेत काम करण्यास उत्सुक आहे", असे  मोदी पुढे म्हणाले आहेत .

आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी लिहिले आहे :

"बांगलादेशातील संसदीय निवडणुकीत बीएनपीला निर्णायक विजय मिळाल्याबद्दल मी तारिक रहमान यांचे हार्दिक अभिनंदन करतो. 

हा विजय बांगलादेशच्या जनतेचा तुमच्या नेतृत्वावरील विश्वास दर्शवितो.

भारत लोकसत्ताक, प्रगतीशील आणि सर्वसमावेशक बांगलादेशाला समर्थन देईल.”

“आपले बहुआयामी संबंध मजबूत करण्यासाठी आणि आपली समान विकास उद्दिष्टे पुढे नेण्यासाठी तुमच्यासोबत काम करण्यास मी उत्सुक आहे."

***

नितीन फुल्लुके / संपदा पाटगावकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2227724) अभ्यागत कक्ष : 11