अर्थ मंत्रालय
प्रस्तावित प्राप्तिकर नियम आणि प्राप्तिकर कायदा, 2025 शी संबंधित फॉर्मबाबत सूचना पाठविण्याचे सीबीडीटीचे भागधारकांना आवाहन
व्यापक सल्लामसलत प्रक्रियेचा एक भाग म्हणून भागधारकांची चार श्रेणींबाबतची मते आणि सूचना गोळा करण्यासाठी सीबीडीटीद्वारे ई-सबमिशन पोर्टलवर सुविधा सुरू
Posted On:
08 FEB 2026 11:06AM by PIB Mumbai
नवी दिल्ली: 08 फेब्रुवारी 2026
ऑगस्ट 2025 मध्ये राष्ट्रपतींची मंजुरी मिळालेल्या प्राप्तिकर कायदा, 2025 येत्या एक एप्रिल 2026 पासून अंमलात येत आहे.
प्राप्तिकर नियम आणि फॉर्मची अंतिम अधिसूचना जारी करण्यापूर्वी, भागधारकांच्या व्यापक सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी, प्रस्तावित प्राप्तिकर नियम आणि फॉर्म www.incometaxindia.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड केले गेले आहेत. प्राप्तिकर कायदा, 2025 च्या तरतुदींशी जुळवून घेण्याबाबत केलेल्या व्यापक सल्लामसलतीनंतर संबंधित प्राप्तिकर नियम आणि संबंधित फॉर्म तयार करण्यात आले आहेत.
भागधारकांनी त्यांचा अभ्यास करून त्याबाबत आपल्या सूचना कळविण्याचे त्यांना आवाहन करण्यात येत आहे, या सूचना अंतिम अधिसूचना जारी करण्यापूर्वी पुनरावलोकनासाठी संकलित करून विचारात घेतल्या जातील.
व्यापक सल्लामसलत प्रक्रियेचा एक भाग म्हणून, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (सीबीडीटी) खालील चार श्रेणींमध्ये भागधारकांकडून मते आणि सूचना मागवत आहे:
-
भाषेचे सरलीकरण
-
लिटिगेशन्स कमी करणे
-
अनुपालनाचे ओझे कमी करणे
-
अनावश्यक/कालबाह्य नियम आणि फॉर्म ओळखणे
या सूचना पाठविता याव्यात यासाठी, ई-सबमिशन पोर्टलवर एक सुविधा सादर करण्यात आली असून ती पुढील लिंकद्वारे वापरता येईल:
https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/ita-comprehensive-review
वरील लिंक 04.02.2026 पासून ई-सबमिशन पोर्टलवरील सर्व भागधारकांसाठी सक्रिय आणि उपलब्ध आहे. भागधारक त्यांचे नाव आणि मोबाइल नंबर प्रविष्ट करून त्यांच्या सूचना सादर करू शकतात, त्यानंतर ओटीपी-आधारित प्रमाणीकरण प्रक्रिया केली जाईल.
सर्व प्रस्तावांमध्ये प्रस्तावित प्राप्तिकर नियमांमधील संबंधित तरतूद किंवा वरील चार श्रेणींमध्ये शिफारस ज्याच्याशी संबंधित आहे तो प्रस्तावित फॉर्म क्रमांक (विशिष्ट नियम, उपनियम किंवा फॉर्म क्रमांकासह) स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे.
***
शिल्पा पोफळे/मंजिरी गानू/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2225079)
अभ्यागत कक्ष : 11