इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
समावेशक, जबाबदार आणि लवचिक कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी राष्ट्रे, नवोन्मेषक आणि नागरिकांना एकत्र आणणारी इंडिया एआय इम्पॅक्ट समिट
डिजिटल इंडिया - आस्क अवर एक्सपर्ट्स’वर सामायिक केले महत्त्वाचे मुद्दे
Posted On:
07 FEB 2026 2:00PM by PIB Mumbai
कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) ही आता भविष्यकालीन संकल्पना राहिलेली नाही. ती आधीच भारतीय लोकांच्या शिकण्याच्या, काम करण्याच्या, सेवा प्राप्त करण्याच्या आणि दैनंदिन समस्या सोडवण्याच्या पद्धतींना आकार देत आहे. 6 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित 'डिजिटल इंडिया – आस्क अवर एक्सपर्ट्स' या कार्यक्रमाच्या नवीनतम भागात हा संदेश केंद्रस्थानी होता, ज्यामध्ये इंडियाएआय मिशनचे सीईओ अभिषेक सिंह यांच्यासोबत आगामी इंडिया एआय इम्पॅक्ट समिटवर एक आकर्षक आणि विचारप्रवर्तक संवाद साधण्यात आला.
ही शिखर परिषद एक लोककेंद्रित व्यासपीठ म्हणून कसे काम करेल, जे तांत्रिक चर्चांच्या पलीकडे जाऊन शिक्षण, आरोग्यसेवा, कृषी, प्रशासन, स्टार्टअप्स, सेवा आणि रोजगारासारख्या क्षेत्रांमध्ये नागरिक आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कसा करू शकतात, यावर या भागामध्ये प्रकाश टाकण्यात आला.

या परिषदेचा उद्देश जागतिक एआय संवादांचे, विशेषतः विकसनशील अर्थव्यवस्था आणि ग्लोबल साउथ देशांमधील लोकांसाठी, प्रत्यक्ष आणि उपयुक्त परिणामांमध्ये रूपांतर करणे हा आहे. "इंडिया एआय इम्पॅक्ट समिटच्या माध्यमातून भारत जागतिक एआय संवादाला केवळ हेतूपासून परिणामांपर्यंत नेत आहे आणि हे सुनिश्चित करत आहे की एआयमधील नावीन्य, कौशल्ये आणि फायदे सर्वांसाठी, विशेषतः ग्लोबल साउथ देशांसाठी, सुलभ असतील," असे अभिषेक सिंह म्हणाले.
एआय शेतकऱ्यांना पीक नियोजन सुधारण्यास मदत करू शकते, डॉक्टरांना जलद आणि अधिक अचूक निदान करण्यास सक्षम करू शकते, वैयक्तिकृत शिक्षण साधनांसह शिक्षकांना मदत करू शकते, लहान व्यवसाय आणि स्टार्टअप्सना जलद गतीने मोठे होण्यास मदत करू शकते आणि नोकरी शोधणाऱ्यांना नवीन करिअर मार्ग शोधण्यास मदत करू शकते यावर चर्चेदरम्यान भर देण्यात आला. शिखर परिषदेत अशा व्यावहारिक वापराची उदाहरणे दाखवण्यात येतील, जी एआय केवळ ऑटोमेशनसाठीच नव्हे तर समावेश, कार्यक्षमता आणि सक्षमीकरणासाठीचे एक साधन कसे असू शकते हे दर्शवेल. "कृत्रिम बुद्धिमत्ता लोकांना बदलण्यासाठी नाही; ती त्यांना सक्षम करण्यासाठी आहे. इंडिया एआय इम्पॅक्ट समिट नागरिकांना हे समजून घेण्यास मदत करण्याबद्दल आहे की एआय दैनंदिन जीवन कसे सुधारू शकते, नवीन संधी अशा निर्माण करू शकते आणि भारताला भविष्यासाठी सज्ज कसे बनवू शकते," असे सिंह यांनी नमूद केले.
सामान्य भीती आणि गैरसमजांचा वेध घेताना सिंह यांनी स्पष्ट केले की कृत्रिम बुद्धिमत्ता मानवाची जागा घेण्याबद्दल नाही, तर मानवी क्षमता वाढवण्याबद्दल आहे. काही कामे बदलणार असली तरी, कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे विशेषतः भारतातील युवा, व्यावसायिक, संशोधक आणि उद्योजकांसाठी नवीन नोकऱ्या, नवीन कौशल्ये आणि नवीन संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. नागरिकांना बदलाच्या भीतीऐवजी सतत शिकणे, जुळवून घेण्याची क्षमता आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साक्षरतेवर लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहित करण्यात आले.
या भागामध्ये विविध गट शिखर परिषदेतून काय मिळवू शकतात, याचीही रूपरेषा मांडण्यात आली.
विद्यार्थी भविष्यातील करिअरच्या संधी शोधू शकतात.
कौशल्य विकासाच्या संधींबद्दल व्यावसायिक माहिती मिळवू शकतात.
पीक नियोजन, हवामानाची माहिती आणि इतर गोष्टींमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता कशी मदत करू शकते, हे शेतकरी शिकू शकतात.
स्टार्टअप्सना नेटवर्क्स, धोरणात्मक माहिती आणि जागतिक सहकार्याची संधी मिळू शकते.
संशोधक आणि शिक्षणतज्ञ अत्याधुनिक एआय कामांमध्ये सहभागी होऊ शकतात.
धोरणकर्ते आणि संस्था जबाबदार एआय आराखडे सह-निर्मित करू शकतात.
संभाषण संपवताना, तज्ञांनी नागरिकांना इंडिया एआय इम्पॅक्ट समिटमध्ये सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन केले. जेव्हा लोक कृत्रिम बुद्धिमत्तेला समजून घेतील, त्यावर विश्वास ठेवतील आणि त्याचा जबाबदारीने वापर करतील, तेव्हाच भारताचा एआय प्रवास यशस्वी होईल, यावर त्यांनी भर दिला. त्यांनी नमूद केले की ही परिषद केवळ तंत्रज्ञानापुरती मर्यादित नाही, तर प्रत्येक भारतीयासाठी उपयुक्त ठरेल अशा एआय-आधारित भविष्याला आकार देण्याबद्दल आहे.
या थेट सत्रात देशभरातील प्रेक्षकांनी सक्रिय सहभाग घेतला, ज्यांनी तज्ञांनी दिलेल्या स्पष्ट आणि सहज समजण्यासारख्या स्पष्टीकरणाचे कौतुक केले. 41व्या भागाचे संपूर्ण रेकॉर्डिंग येथे उपलब्ध आहे.
https://www.youtube.com/live/Bvf1CMQNIVA?si=BeOO5F7dugTXWiJ1.
'डिजिटल इंडिया आस्क अवर एक्सपर्ट्स' हा कार्यक्रम नागरिक आणि या क्षेत्रातील तज्ञांमध्ये थेट संवाद साधण्यास मदत करत आहे, ज्यामुळे माहितीपूर्ण सहभाग आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा जबाबदार वापर करण्यास प्रोत्साहन मिळत आहे. ही मालिका डिजिटल इंडियाच्या यूट्यूब चॅनलवर थेट प्रसारित केली जाते. https://www.youtube.com/@DigitalIndiaofficial.
आगामी भागांबद्दल आणि डिजिटल इंडिया उपक्रमांबद्दलच्या अपडेट्ससाठी, भेट द्या www.digitalindia.gov.inand www.negd.gov. in.
***
माधुरी पांगे/नंदिनी मथुरे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2224868)
अभ्यागत कक्ष : 12