रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वंदे भारत शयनयान ‘ट्रेनसेटस्’च्या 260 रेकच्या निर्मितीची योजना : अश्विनी वैष्णव

Posted On: 04 FEB 2026 10:07PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 फेब्रुवारी 2026

वंदे भारत शयनयानसारख्या नवीन ‘रोलिंग स्टॉक’च्या विकासासाठी सुरक्षित, विश्वसनीय आणि आरामदायी प्रवासाची खात्री करण्याच्या उद्देशाने तांत्रिक नवोन्मेष, धोरणात्मक नियोजन आणि उत्पादन यांचा मेळ घालणाऱ्या एका सर्वांगीण दृष्टिकोनाची आवश्यकता आहे. यामध्ये प्रोटोटाइपचा विकास, व्यापक चाचण्या आणि त्यानंतर मालिकात्मक उत्पादन यांचा समावेश असतो.

वंदे भारत शयनयानसह  रेल गाडी  उत्पादन कार्यक्रम टप्प्याटप्प्याने राबवला जात असून यात ‘प्रोटोटाइप’  विकास, चाचण्या आणि मालिकात्मक उत्पादनाचा समावेश आहे. हे काम बीईएमएल, इंटिग्रल कोच फॅक्टरी, चेन्नई आणि तंत्रज्ञान भागीदार यांच्या माध्यमातून केले जात आहे. 

या ‘ट्रेनसेटस’ चा नियमित प्रवासी सेवेत समावेश मागणी आणि परिचालन सज्जतेनुसार टप्प्याटप्प्याने केला जाईल. वंदे भारत ‘स्लीपर ट्रेनसेट’च्या एकूण 260 रेकच्या निर्मितीचे नियोजन करण्यात आले आहे.

प्रवाशांचा अनुभव सुधारण्यासाठी तसेच सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाच्या बाबतीत नवीन मापदंड स्थापित करण्यासाठी, या ट्रेनसेटमध्ये आधुनिक डबे बसवण्यात आले असून त्यात प्रगत सुरक्षा वैशिष्ट्ये आणि प्रवासी सुविधांचा समावेश करण्यात आला आहे, जसे की:

• धक्के-मुक्त अर्ध-कायमस्वरूपी कपलर आणि अँटी क्लायंबर्स

• कवच प्रणालीने सुसज्ज.

• 180/160 किमी प्रतितास डिझाइन/कार्यकारी वेगासह उच्च त्वरण क्षमता.

• ईएन  मानकांकनानुसार अपघात परिस्थितीमध्‍ये टिकून राहू  असतील अशा मजबूत   डब्यांची रचना.

• अग्निसुरक्षा मानकांचे पालन करण्यासाठी प्रत्येक डब्याच्या शेवटी फायर बॅरियर दरवाजे.

• सुधारित अग्निसुरक्षा – इलेक्ट्रिकल कॅबिनेट आणि शौचालयांमध्ये एरोसोल-आधारित आग शोध आणि अग्निशमन प्रणाली.

• ऊर्जा कार्यक्षमतेसाठी रीजनरेटिव्ह ब्रेकिंग प्रणाली.

• मध्यवर्ती नियंत्रित स्वयंचलित प्लग दरवाजे आणि पूर्णपणे सीलबंद रुंद मार्गिका.

• सर्व डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे.

• आपत्कालीन परिस्थितीत प्रवासी आणि ट्रेन व्यवस्थापक/लोको पायलट यांच्यात संवादासाठी आपत्कालीन टॉक-बॅक युनिट.

• दिव्यांग प्रवाशांसाठी, प्रत्येक टोकाच्या ड्रायव्हिंग कोचमध्ये विशेष शौचालय.

• वातानुकूलन, प्रकाशयोजना इत्यादी प्रवासी सुविधांच्या उत्तम स्थिती निरीक्षणासाठी केंद्रीकृत कोच मॉनिटरिंग प्रणाली.

• वरच्या बर्थवर चढण्याच्या सुलभतेसाठी एर्गोनॉमिक पद्धतीने डिझाइन केलेली शिडी.

ही माहिती केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.

सुवर्णा बेडेकर /श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2223504) अभ्यागत कक्ष : 11