अवजड उद्योग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पीएम इ-ड्राईव्ह योजना

Posted On: 03 FEB 2026 6:57PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 फेब्रुवारी 2026

पीएम इलेक्ट्रिक ड्राइव्ह रिव्होल्यूशन इनोव्हेटिव्ह व्हेईकल एनहांसमेंट (पीएम ई-ड्राइव्ह) या मोहिमेमुळे विजेवर चालणाऱ्या ई-दुचाकी (ई-2डब्ल्यू), ई-तीन चाकी (ई-रिक्षा, ई-कार्ट आणि एल 5 श्रेणी), ई-रुग्णवाहिका आणि ई-ट्रक यासह अनेक विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या लक्ष्यित मागणी प्रोत्साहन दिले जात  असून, देशभरात विजेवर चालणाऱ्या वाहनांचा (ईव्ही) अवलंब करण्यास गती मिळाली आहे.यामुळे इलेक्ट्रिक मोबिलिटीचा प्रारंभिक खर्च कमी झाला आहे.या योजनेअंतर्गत, ग्राहकांसाठी (खरेदीदार/अंतिम वापरकर्ते) खरेदीकरिता आगाऊ प्रोत्साहन रक्कम दिली जाते जी रक्कम  मूळ कंपनीला (OEMs)परत दिली  जाते, यातून इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी किंमत कमी होते.

या योजनेअंतर्गत, एकूण 28 लाख विजेवर चालणाऱ्या वाहनांचा समावेश आहे.तसेच 27 जानेवारी 2026 पर्यंत ,19.19 लाख ई-2चाकी आणि 2.93 लाख तीन चाकी गाड्या मिळून एकूण 22.12 लाख ईव्ही वाहने या योजनेअंतर्गत विकली गेली आहेत.

शिवाय, या योजनेअंतर्गत 14,028 इलेक्ट्रिक बसेस तैनात करण्यासाठी एकूण 4,391 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यापैकी  13,800 ई-बसेस चार दशलक्षांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या बेंगळुरू, दिल्ली, मुंबई, हैदराबाद, अहमदाबाद, पुणे आणि सुरत या सात शहरांमध्ये,तैनात करण्यात येत असून  दोन टप्प्यात त्यांचे वाटप करण्यात आले आहे.पहिल्या टप्प्यात वाटप केलेल्या 10,900 ई-बससाठी सीईएसएलने आधीच निविदा काढण्यात आल्या आहेत, तर दुसऱ्या टप्प्यात वाटप केलेल्या उर्वरित 2,900 ई-बससाठी 09.01.2026 रोजी निविदा काढण्यात आल्या होत्या.

ही योजना ईव्ही चार्जिंग पायाभूत सुविधांच्या तैनात आणि चाचणी सुविधांच्या प्रगतीला देखील समर्थन देते. संपूर्ण भारतात ईव्ही सार्वजनिक चार्जिंग स्टेशन (ईव्हीपीसीएस) तैनात करण्यासाठी असलेल्या योजनेअंतर्गत एकूण 2,000 कोटी रुपयांची तरतूद  करण्यात आली आहे.

या उपाययोजनांमुळे ईव्ही प्रणाली मजबूत झाली आहे, ग्राहकांचा विश्वास वाढला आहे आणि स्वच्छ आणि शाश्वत गतिशील उपायांचा मोठ्या प्रमाणात अवलंब करण्यास मदत झाली आहे.

31 डिसेंबर, 2025 पर्यंत, पीएम ई-ड्राइव्ह योजनेअंतर्गत, ई-2चाकी  आणि ई-3चाकीच्या खरेदीदारांना देण्यात येणाऱ्या मागणी प्रोत्साहनाची परतफेड म्हणून, ई-2 चाकी  आणि ई-3 चाकीच्या मूळ उपकरण उत्पादकांना (ओईएम) एकूण 1,703 कोटी रुपये परत करण्यात आले आहेत

ही माहिती अवजड उद्योग राज्यमंत्री भूपतिराजू श्रीनिवास वर्मा यांनी लोकसभेत आज एका लेखी उत्तराद्वारे दिली.


निलीमा चितळे/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर


 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2222761) अभ्यागत कक्ष : 28