पंतप्रधान कार्यालय
व्हेनेझुएलाच्या हंगामी अध्यक्ष डेल्सी एलोइना रॉड्रिग्ज गोमेझ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला
भारत-व्हेनेझुएला दरम्यान सर्व क्षेत्रांमधील भागीदारी अधिक वृद्धिंगत आणि दृढ करण्यावर दोन्ही नेत्यांची सहमती
दोन्ही नेत्यांनी ग्लोबल साउथसाठी परस्परांबरोबरच्या दृढ सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले
प्रविष्टि तिथि:
30 JAN 2026 10:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 जानेवारी 2026
व्हेनेझुएलाच्या हंगामी अध्यक्ष डेल्सी एलोइना रॉड्रिग्ज गोमेझ यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.
व्यापार आणि गुंतवणूक, ऊर्जा, डिजिटल तंत्रज्ञान, आरोग्य, शेती आणि दोन्ही देशांच्या नागरिकांमधील संबंध, यासह सर्व क्षेत्रांमध्ये भारत-व्हेनेझुएला भागीदारी आणखी वाढवण्यावर आणि दृढ करण्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली.
दोन्ही नेत्यांनी परस्पर हिताच्या विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारांचे आदानप्रदान केले आणि ग्लोबल साउथसाठी दोन्ही देशांमधील दृढ सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले. परस्परांच्या संपर्कात राहण्यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली.
* * *
सोनाली काकडे/राजश्री आगाशे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2221103)
आगंतुक पटल : 13