अर्थ मंत्रालय
केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 सादर केल्यानंतर देशभरातील युवकांबरोबर साधणार संवाद
देशभरातील सुमारे 30 विद्यार्थी 1 फेब्रुवारी 2026 रोजी संसदीय कामकाजाचे पाहणार थेट प्रक्षेपण
प्रविष्टि तिथि:
30 JAN 2026 9:09PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 जानेवारी 2026
केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 सादर झाल्यानंतर, केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन देशाच्या विविध भागांतील सुमारे 30 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधतील.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून, या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लोकसभेच्या गॅलरीतून केंद्रीय अर्थसंकल्पाचे थेट सादरीकरण पाहण्याची संधी मिळेल. या उपक्रमामुळे त्यांना वर्षातील सर्वात महत्त्वाच्या संसदीय कामकाजांपैकी एक दिवस पाहता येईल.
भारतातील विविध राज्यांमधील हे विद्यार्थी असून वाणिज्य, अर्थशास्त्र, वैद्यकीय शिक्षण आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांसह विविध शैक्षणिक शाखांमध्ये शिक्षण घेणारे आहेत.
हे विद्यार्थी कर्तव्य भवन-1 येथील अर्थ मंत्रालयाला भेट देतील आणि मंत्रालयाच्या कामकाजाची, धोरण निर्मिती प्रक्रियेची आणि राष्ट्र उभारणीतील संस्थांच्या भूमिकेची माहिती घेण्यासाठी विविध वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधतील.
त्यानंतर संध्याकाळी, सीतारामन विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. या संवादादरम्यान विद्यार्थी त्यांच्या कल्पना, दृष्टिकोन आणि आकांक्षा मांडतील आणि आजचे युवक आणि त्यांची देशाविषयीची मते व्यक्त करतील.
या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना वित्त, अर्थशास्त्र, सुशासन आणि लोकशाही प्रक्रियांबद्दल अधिक जागरूकता निर्माण करण्यासाठी संधी उपलब्ध करून देणे, तसेच भारताच्या आर्थिक आणि संसदीय प्रक्रियांमध्ये तरुणांच्या माहितीपूर्ण, विधायक सहभागास प्रोत्साहन देणे हा आहे.
अर्थसंकल्पाच्या तयारी दरम्यान, विविध माध्यमांतील नागरिक तसेच तरुणांचाही समावेश आहे. या सर्वांकडून विविध सूचना मागवण्यात आल्या आहेत, त्यांचे प्रतिबिंब आगामी केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये दिसून येईल.
* * *
सोनाली काकडे/राजश्री आगाशे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2221078)
आगंतुक पटल : 6