नागरी उड्डाण मंत्रालय
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने बारामतीजवळील दुर्दैवी विमान अपघातानंतर तत्काळ तपास प्रक्रिया सुरू केली
अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स ताब्यात घेण्यात आला
सखोल, पारदर्शक आणि निश्चित वेळेत चौकशी करण्याला सर्वोच्च प्राधान्य आहे
प्रविष्टि तिथि:
29 JAN 2026 12:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 जानेवारी 2026
बारामतीजवळ झालेल्या दुर्दैवी विमान अपघातानंतर, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने सर्व आवश्यक प्रतिसाद आणि तपास यंत्रणा तत्काळ सक्रिय केल्या आहेत. सखोल, पारदर्शक आणि निश्चित वेळेत चौकशी करण्याला सर्वोच्च प्राधान्य आहे.
दिल्ली येथील विमान अपघात तपास विभाग (एएआयबी) मधील तीन अधिकाऱ्यांचे एक पथक आणि डीजीसीए, मुंबई स्थित नागरी विमान वाहतूक महासंचालनालय कार्यालयातील तीन अधिकाऱ्यांचे दुसरे पथक 28 जानेवारी रोजी अपघातस्थळी पोहोचले. एएआयबीचे महासंचालक जी व्ही जी युगंधर देखील त्याच दिवशी घटनास्थळी पोहोचले. तपास जलदगतीने सुरू आहे आणि अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स ताब्यात घेण्यात आला आहे.
नागरी विमान वाहतूक मंत्रालय स्थापित मानक कार्यपद्धती (एसओपी) आणि निर्धारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार, निश्चित वेळेत तपास पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे.
एएआयबी नियम, 2025 च्या नियम 5 आणि 11 नुसार हा तपास सुरू करण्यात आला आहे.
* * *
नेहा कुलकर्णी/सुषमा काणे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2219993)
आगंतुक पटल : 20