अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 च्या तयारीचा अंतिम टप्पा आज नवी दिल्लीत हलवा समारंभाने सुरू झाला

प्रविष्टि तिथि: 27 JAN 2026 7:24PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 जानेवारी 2026

 

केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 च्या तयारी प्रक्रियेचा अंतिम टप्पा दर्शवणारा हलवा समारंभ आज नॉर्थ ब्लॉक येथील बजेट प्रेसमध्ये केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारमण आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांच्या उपस्थितीत पार पडला.

केंद्रीय अर्थसंकल्प तयार करण्यात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांना 'लॉक-इन' (परिसरातच राहण्याची प्रक्रिया सुरु होण्यापूर्वी) करण्यापूर्वी 'हलवा समारंभ' आयोजित केला जातो. 1 फेब्रुवारी, 2026 रोजी केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 सादर केला जाईल.

हलवा समारंभात, केंद्रीय अर्थमंत्र्यांसोबत अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या सर्व विभागांचे सचिव आणि अर्थसंकल्प तयार करण्यात सहभागी असलेले इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

समारंभाचा एक भाग म्हणून केंद्रीय अर्थमंत्र्यांनी बजेट प्रेसला भेट दिली आणि तयारीचा आढावा घेतला, तसेच अर्थसंकल्प तयार करणाऱ्या संपूर्ण चमूला  शुभेच्छा दिल्या.

वार्षिक वित्तीय विवरणपत्र (सामान्यतः बजेट म्हणून ओळखले जाते), अनुदानाची मागणी, वित्त विधेयक यांसह केंद्रीय अर्थसंकल्प संबंधी  सर्व दस्तावेज, "युनियन बजेट मोबाइल अॅप" वर उपलब्ध असतील जेणेकरून संसद सदस्य (खासदार) आणि सामान्य जनतेला डिजिटल पद्धतीने बजेट संबंधी दस्तावेज सहजरित्या पाहता येतील. हे अॅप द्विभाषिक (इंग्रजी आणि हिंदी) आहे आणि ते अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल. हे अॅप केंद्रीय अर्थसंकल्प वेब पोर्टल (www.indiabudget.gov.in) वरून देखील डाउनलोड करता येईल.

1 फेब्रुवारी, 2026 रोजी रोजी संसदेत केंद्रीय अर्थमंत्र्यांचे अर्थसंकल्पीय भाषण पूर्ण झाल्यानंतर अर्थसंकल्पीय दस्तावेज मोबाइल अॅप आणि संकेतस्थळावर उपलब्ध होतील.

 

* * *

निलिमा चितळे/सुषमा काणे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2219321) आगंतुक पटल : 9
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Odia , Tamil , Malayalam , English , Urdu , हिन्दी , Kannada