गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

तीन नवे फौजदारी कायदे दर्शवणारा गृह मंत्रालयाने सादर केलेला चित्ररथ, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली वसाहतवादाच्या खुणा पुसून टाकणाऱ्या ऐतिहासिक कायदेविषयक सुधारणांचे प्रतीक असल्याचे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांचे प्रतिपादन

प्रविष्टि तिथि: 26 JAN 2026 10:51PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 जानेवारी 2026

 

प्रजासत्ताक दिन संचलनात आज गृह मंत्रालयाने (एमएचए) सादर केलेल्या, तीन नवीन फौजदारी कायदे दर्शवणाऱ्या चित्ररथाने,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली वसाहतवादाच्या खुणा पुसून टाकणाऱ्या ऐतिहासिक कायदेशीर सुधारणा दर्शविल्या असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी केले. शिक्षा केंद्रित प्रणालीकडून न्याय केंद्रित प्रणालीकडे सुरू झालेला भारताचा प्रवास त्या दर्शवतात.

एक्स या समाजमाध्यमांवरील संदेशात, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी, 'आज प्रजासत्ताक दिन संचलनात 'गृह मंत्रालयाने सादर केलेल्या तीन नव्या फौजदारी कायद्याच्या चित्ररथाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली वसाहतवादाच्या खुणा पुसून टाकणाऱ्या ऐतिहासिक कायदेशीर सुधारणा दर्शवल्या, ज्या भारताचा शिक्षा केंद्रित प्रणालीकडून कायदेशीर प्रणालीकडे सुरू झालेल्या  प्रवासाची सुरुवात आहे. नवीन ई-साक्ष्य, ई-समन्स, न्याय श्रुती, नाफिस आणि आयसीजेएस प्रणालींचे योग्य प्रदर्शन करून, हा चित्ररथ नव्या भारतातील जलद, अचूक आणि लोक केंद्रित न्यायव्यवस्थेचे  महत्त्व याबाबत नागरिकांना जागरूक करतो.”

 

* * *

निलिमा चितळे/विजयालक्ष्‍मी साळवी/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2218945) आगंतुक पटल : 7
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , हिन्दी , Gujarati , Kannada