गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्याकडून सर्व देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
आपल्या भक्कम लोकशाहीचा पाया रचणारे स्वातंत्र्यसैनिक आणि राज्यघटनाकार यांना गृह मंत्र्यांनी वाहिली आदरांजली
मोदीजींच्या नेतृत्वाखाली घटनात्मक मूल्ये अधिक बळकट करण्याचा आणि 'विकसित भारत' घडवण्याचा संकल्प करूया, अशा शब्दांत केलं आवाहन
Posted On:
26 JAN 2026 12:44PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 जानेवारी 2026
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी सर्व देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या सामर्थ्यशाली लोकशाहीचा पाया रचणारे स्वातंत्र्यसैनिक आणि राज्यघटनाकार यांना गृह मंत्र्यांनी यावेळी आदरांजली वाहिली.
'X' या समाज माध्यमावरील आपल्या टिप्पणीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, "सर्व देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. या प्रसंगी मी, आपल्या सामर्थ्यशाली लोकशाहीचा पाया रचणारे स्वातंत्र्यसैनिक आणि राज्यघटनाकार यांना आदरपूर्वक वंदन करतो. चला, मोदीजींच्या नेतृत्वाखाली घटनात्मक मूल्ये अधिक बळकट करण्याचा आणि 'विकसित भारत' घडवण्याचा आपण संकल्प करूया."
* * *
यश राणे / आशुतोष सावे / दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2218768)
अभ्यागत कक्ष : 40
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam