वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

गल्फूड 2026 मध्ये 161 प्रतिनिधींमार्फत भारत वैविध्यतापूर्ण कृषी - खाद्य परिसंस्थेचे करणार प्रदर्शन


'अपेडा' च्या 'भारती' या मंडपात 8 उच्चक्षमताधारक स्टार्टअप्स चे प्रदर्शन 

गल्फूड 2026 मध्ये भारत प्रथमच होणार भागीदार

प्रविष्टि तिथि: 23 JAN 2026 11:45AM by PIB Mumbai

 

भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येणारे  ‘कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (अपेडा), गल्फूड 2026 मध्ये एका मजबूतविस्तारित आणि प्रभावी उपस्थितीसह सहभागी होत आहे. यामुळे जागतिक कृषी-अन्न व्यापारात भारताचे वाढते स्थान अधोरेखित होत आहे. भारत यावेळी गल्फूड 2026 मध्ये भागीदार देश असणार आहे.  एक विश्वसनीय पुरवठादार देश आणि जागतिक अन्न सुरक्षा आणि  लवचिक पुरवठा साखळ्यांमध्ये प्रमुख योगदानकर्ता म्हणून त्याचे धोरणात्मक महत्त्व यातून दिसून येते .

गल्फूड 2026 मधील  भारताच्या सहभागात  मागील प्रदर्शनाच्या तुलनेत  महत्त्वपूर्ण सुधारणा दिसून येते आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत भारतीय दालनाचा आकार दुप्पट झाला आहे. यामुळे भारतीय कृषी-खाद्य उत्पादनांच्या निर्यातीचा वाढता विस्तारभारतीय उत्पादनांना वाढती जागतिक मागणी आणि निर्यातदारसंस्था आणि स्टार्टअप्सचा वाढलेला सहभाग प्रतिबिंबित होतो आहे .

या प्रदर्शनात भारताचा मंडप 1,434 चौरस मीटर जागेत विस्तारलेला आहे.  यात  प्रक्रिया केलेले अन्नपदार्थताजी आणि गोठवलेली उत्पादनेकडधान्येधान्येपेयेमूल्यवर्धित अन्न उत्पादने आणि कृषी-निर्यात स्टार्टअप्स यांसारख्या विविध श्रेणींमधील 161 प्रदर्शकांचा समावेश आहे. भारताच्या या दालनात निर्यातदारशेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ), सहकारी संस्थास्टार्टअप्सराज्य सरकारी संस्था आणि राष्ट्रीय संस्था या सर्व घटकांचा सहभाग आहे. यामुळे भारताच्या कृषी-अन्न परिसंस्थेचे आणि निर्यात सज्जतेचे एक सर्वसमावेशक चित्र सादर होत आहे .

भारताच्या विशाल कृषी आणि प्रादेशिक विविधतेचे दर्शन या प्रदर्शनातून घडणार आहे. या प्रदर्शनात 25 राज्ये आणि प्रदेशांमधील प्रदर्शक सहभागी झाले आहेत.

या प्रदर्शनातले भारती (BHARATI) दालन हे या प्रदर्शनातल्या भारताच्या सहभागाचे मुख्य आकर्षण ठरले आहे. निर्यातक्षम कृषी-अन्न आणि कृषी-तंत्रज्ञान स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने (APEDA) सुरू केलेला हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. दुबई वर्ल्ड ट्रेड सेंटरमधील स्टार्टअप झोन मधल्या या भारती दालनात भारतातील आठ उच्च कार्यक्षमतेच्या स्टार्टअप्सचा समावेश आहे. या प्रदर्शनासाठी राष्ट्रीय स्तरावर प्रक्रिया राबवली गेली होतीत्यात 100 पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झालेआणि त्यातून सहभागींची निवड करण्यात आली. या स्टार्टअप्सनी प्रदर्शनात कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाच्या फार्म टू फॉरेन (शेत ते परदेश) या संकल्पनेला अनुसरूननवोन्मेषी उत्पादनेतंत्रज्ञानाधारित उपाययोजना आणि निर्यातीला चालना देणाऱ्या सेवा मांडल्या आहेत.

गल्फूड 2026 चे आयोजन दोन मुख्य ठिकाणांवर करण्यात आले आहे. या दोन्ही ठिकाणचा भारताचा सहभाग लक्षवेधक आहे. दुबई एक्स्पो सिटी मध्ये वर्ल्ड फूड हॉलभरडधान्येधान्य आणि तृणधान्ये हॉलतसेच गल्फूड ग्रीन अशी विविध दालने आहेत. या सर्व मांडणीतून शाश्वततानवोन्मेष आणि भविष्यातील अन्न व्यवस्थेवर भर दिला गेला आहे. तर दुबई वर्ल्ड ट्रेड सेंटर इथे पेय सभागृह  आणि भारती दालन यासह स्टार्टअप दालन  अशा दालनांचा अंतर्भाव आहे.

गल्फूड 2026 मधील भारताचा सहभाग हा भारत आणि संयुक्त अरब अमिरातीतील सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारामुळे निर्माण होणाऱ्या संधींना असनुसरून आहे. या करारामुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापारी संबंध अधिक दृढ झाले आहेत तसेच भारतीय कृषी तसेच अन्न उत्पादनांसाठी आखाती प्रदेशातील बाजारपेठा खुल्या झाल्या आहेत.

या सर्वसमावेशक आणि व्यापक सहभागाच्या माध्यमातून खरेदीदार आणि विक्रेत्यांमधील परस्पर संपर्काला बळकटी देणेभारतीय ब्रँड्सना जागतिक स्तरावर प्रोत्साहन देणेस्टार्टअप्स आणि निर्यातदारांना पाठबळ देणे तसेच भारताच्या कृषी अन्न वैविध्यतेचे दर्शन घडवणे हे कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाचे उद्दिष्ट आहे. हा सहभाग म्हणजे जागतिक कृषी अन्न मूल्य साखळीत एक विश्वसार्हनवोन्मेषी आणि शाश्वत देश म्हणून भारताची भूमिका अधिक बळकट करण्याचा प्रयत्न आहे.

***

सुवर्णा बेडेकर/उमा रायकर/तुषार पवार/परशुराम कोर

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2217738) आगंतुक पटल : 15
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu , Malayalam