पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिरुवनंतपुरम येथील कार्यक्रमातील काही क्षणचित्रे केली सामायिक, या कार्यक्रमात त्यांनी विविध योजना आणि उपक्रमांचे केला प्रारंभ
प्रविष्टि तिथि:
23 JAN 2026 3:58PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिरुवनंतपुरम येथील कार्यक्रमातील काही क्षणचित्रे सामायिक केली आहेत. पंतप्रधानांनी या कार्यक्रमात विविध योजना आणि उपक्रमांचा प्रारंभ केला.
एक्स या समाज माध्यमावरील संदेशांच्या मालिकेत पंतप्रधान मोदी म्हणाले;
“तिरुवनंतपुरम येथे आयोजित विविध योजना आणि उपक्रमांच्या उद्घाटन कार्यक्रमात, मी देशभरातील शहरी पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला.”
‘’ पीएम स्वनिधी योजनेंतर्गत क्रेडिट कार्ड्सचा शुभारंभ केला तसेच कर्जांचे वितरण केले, यामुळे लोकांना सक्षम बनवण्यासाठी आणि त्यांचे जीवनमान चांगले व्हावे यासाठी आम्ही सुरू केलेल्या प्रयत्नांना गती मिळेल.’’
‘’धन्यवाद तिरुवनंतपुरम!
येथील ऊर्जा आणि सळसळते चैतन्य अतुलनीय होते...’’
***
सुवर्णा बेडेकर/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2217713)
आगंतुक पटल : 7