इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ मध्ये जगाचा भारतावरील विश्वास केला अधोरेखित
जागतिक उद्योग धुरिणांनी भारतासोबत भागीदारी वाढविण्यात स्वारस्य व्यक्त केल्यावर महत्त्वाच्या बाबींवर झाली चर्चा
‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिटमध्ये सक्रियपणे सहभागी होण्यासाठी एआय नेत्यांना केले प्रोत्साहित
प्रविष्टि तिथि:
22 JAN 2026 9:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 जानेवारी 2026
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान, रेल्वे आणि माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दावोस येथील जागतिक आर्थिक मंच (डब्ल्यूईएफ) मधील आपल्या सहभागादरम्यान जगाचा भारतावरील वाढता विश्वास आणि एक विश्वासार्ह मूल्य-साखळी भागीदार म्हणून भारताचा उदय अधोरेखित केला.
केंद्रीय मंत्री म्हणाले की, दावोस येथील डब्ल्यूईएफ मधील सहभाग भारताच्या विकासगाथेला बळकटी देत असून, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, वाहतूक यंत्रणा, उत्पादन आणि उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये भारतासोबत भागीदारी करण्यात जागतिक नेत्यांना रस आहे.
त्यांनी नमूद केले की जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, युरोप आणि अमेरिकेसोबत भारताचे आधीच सहकार्याचे संबंध असून ही भागीदारी महत्त्वाच्या खनिज परिसंस्था मजबूत करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते.
कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल बोलताना वैष्णव यांनी अनुप्रयोग आणि मॉडेल्सपासून ते चिप्स, पायाभूत सुविधा आणि ऊर्जा या सर्व क्षेत्रांमधील भारताचा दृष्टिकोन मांडला. ते म्हणाले की, भारताचा आयटी उद्योग उत्पादकता आणि मूल्य यांना चालना देणारे एआय-आधारित उपाय प्रदान करण्यावर केंद्रित आहे.
सेमीकंडक्टर्सबद्दल बोलताना मंत्री म्हणाले की, अनेक मंजूर प्रकल्पांमध्ये प्रायोगिक उत्पादन सुरू झाले असून लवकरच व्यावसायिक उत्पादन सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.
मंत्र्यांनी नमूद केले की, भारताचा सातत्यपूर्ण आर्थिक विकास, सुधारणांची मजबूत गती आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या उभारणीवर दिला जात असलेला भर याची जागतिक स्तरावर दखल घेतली जात आहे. ते म्हणाले की, जग भारताकडे एक विश्वासू आणि विश्वासार्ह भागीदार म्हणून पाहत आहे, जो प्रगत तंत्रज्ञानाची सह-निर्मिती आणि सह-विकास करण्यास सक्षम आहे.
* * *
सुवर्णा बेडेकर/सुषमा काणे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2217502)
आगंतुक पटल : 7