पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अथक परिश्रम आणि प्रगतीच्या भावनेला अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले. तसेच मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा या राज्यांच्या स्थापनदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या
प्रविष्टि तिथि:
21 JAN 2026 2:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 जानेवारी 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईशान्येकडील मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा या तीन राज्यांतील लोकांना राज्य स्थापना दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
या प्रदेशातील सर्व बंधू भगिनींना पंतप्रधानांनी स्नेहपूर्वक शुभेच्छा दिल्या असून त्यांच्या परिश्रमांच्या जोरावर ते जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त करतील असा विश्वास व्यक्त केला आहे.
यानिमित्त पंतप्रधानांनी सातत्यपूर्ण प्रयत्न आणि प्रगतीच्या भावनेला अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे.
संस्कृत सुभाषित याप्रमाणे आहे-
“चरैवेति चरैवेति चरन्वै मधु विन्दति।
सूर्यास्य पश्य श्रेमाणं न मामार न जीर्यति॥”
ज्याप्रमाणे सूर्य कधीही न थकता आपल्या तेजाने जगाला उजळून टाकतो त्याचप्रमाणे प्रत्येकाने सतत पुढे मार्गक्रमण करत प्रगतीचे शिखर गाठले पाहिजे, कारण केवळ सातत्यपूर्ण प्रयत्न करणारी व्यक्तीच प्रगतीची गोड फळे चाखू शकते,
पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये लिहिले आहे:
"आज ईशान्येकडील मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा ही तीन राज्ये आपला स्थापना दिवस साजरा करत आहेत. या निमित्त माझ्या सर्व बंधू भगिनींना खूप खूप शुभेच्छा. तुमच्या प्रयत्नांनी तुम्हाला जीवनातील सर्व क्षेत्रांमध्ये विजयश्री लाभो, हीच मनोकामना आहे.
चरैवेति चरैवेति चरन्वै मधु विन्दति।
सूर्यास्य पश्य श्रेमाणं न मामार न जीर्यति॥”
नेहा कुलकर्णी /भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2216851)
आगंतुक पटल : 4
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam