दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

टपाल विभागाकडून एमएसएमई उद्योग तसेच छोट्या निर्यातदारांना निर्यातविषयक लाभ मिळणार

प्रविष्टि तिथि: 20 JAN 2026 6:38PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 जानेवारी 2026

 

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, केंद्रीय दळणवळण मंत्रालयाच्या अखत्यारीतील टपाल विभागाने 15 जानेवारी 2026 पासून टपाल विभागाद्वारे होणाऱ्या निर्यातीसाठी -  जकातीचा परतावा, निर्यात केलेल्या उत्पादनांवरील शुल्क आणि कर माफी (आरओडीटीईपी) तसेच राज्यांचे आणि केंद्रीय कर तसेच अधिभार यांच्यावर सूट (आरओएससीटीएल) - इत्यादी निर्यातविषयक लाभ द्यायला सुरुवात केली आहे.

हा उपक्रम म्हणजे निर्यातीसाठी लहान आणि मध्यम मूल्याच्या आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात टपालाच्या जाळ्यावर अवलंबून असलेल्यांसाठी विशेषतः सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमईज), कारागीर, स्टार्ट-अप्स आणि लहान निर्यातदार यांच्यासाठी निर्यातीचा मार्ग सुलभ आणि विस्तारण्याच्या दिशेने टाकलेले मोठे पाऊल आहे. स्वयंचलित आयजीएसटी परतावे आधीच अस्तित्वात असताना, टपालाच्या माध्यमातून निर्यातविषयक अनुदानाची उपलब्धता यामुळे खर्चात जास्त बचत होऊन भारतीय निर्यातदारांची स्पर्धात्मकता आणखी सुधारली आहे.

टपाल विभाग आणि सीबीआयसी यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या डाक घर निर्यात केंद्रांच्या (डीएनकेज) माध्यमातून टपालाद्वारे निर्यातीचे कार्य केले जाते आणि त्यायोगे एकच छताखाली निर्यातविषयक संपूर्ण सेवा पुरवली जाते. सध्या देशभरात 1,013 डीएनके कार्यरत असून त्यांच्या माध्यमातून निर्यातदार अगदी दुर्गम तसेच वंचित भागांना बुकिंग, डिजिटल दस्तावेजीकरण आणि सुलभ सीमाशुल्क मंजुरीसह जागतिक बाजारपेठांपर्यंत पोहोचणे शक्य झाले आहे.

हे लाभ कार्यान्वित करण्यासाठी डीएनके/स्वयंसेवा पोर्टल आणि सीमाशुल्क मंचांवर आवश्यक प्रणाली सुधारणा लागू करण्यात आल्या असून त्यांना निर्यातदार तसेच क्षेत्र अधिकाऱ्यांसाठीच्या सुस्पष्ट प्रमाणित कार्य पद्धतींचे  पाठबळ देण्यात आले आहे.

आजघडीला भारतीय टपाल विभाग माल उचलणे, दस्तावेजीकरण, ऑनलाईन पैसे भरणे, चेहराविरहीत सीमाशुल्क मंजुरी आणि वास्तविक वेळेत  घेता येणारा मागोवा यांसह एक खिडकी, संपूर्ण निर्यात सुविधा देत आहे. आंतरराष्ट्रीय ट्रॅक्ड पॅकेट सेवा (आयटीपीएस) यांसारख्या जगातील 135 देशांमध्ये उपलब्ध असणाऱ्या सेवा सीमापार ई-वाणिज्य शिपमेंट्ससाठी विश्वासार्ह आणि किफायतशीर पर्याय उपलब्ध करून देत आहेत.

टपाल विभागाच्या विस्तृत जाळ्याचा आणि डिजिटल मंचाचा वापर करून घेऊन, टपाल विभाग निर्यात आणि पोहोच यांतील दरी सांधत आणि जागतिक व्यापार क्षेत्रात भारताचे स्थान आणखी बळकट करत लहान निर्यातदार तसेच एमएसएमई उद्योगांना सक्षम करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

 

* * *

सुषमा काणे/संजना चिटणीस/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2216581) आगंतुक पटल : 13
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Punjabi , Malayalam