दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
टपाल विभागाने देशभरात 887 एटीएम कार्यान्वित करत, आपल्या एटीएम पायाभूत सुविधांचे केले आधुनिकीकरण
प्रविष्टि तिथि:
20 JAN 2026 4:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 जानेवारी 2026
भारतीय टपाल विभागाने देशभरातील आपल्या एटीएम पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण केले आहे. या माध्यमातून टपाल विभागाने वापरकर्त्यांसाठी आपल्या सेवा अधिक सुलभ आणि सोयीस्कर बनवण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल टाकले आहे.
टपाल विभागाच्या देशभरातील विविध कार्यालयांमध्ये 887 एटीएम स्थापित केलेले आहेत. या सुविधेमुळे नागरिकांना आपल्या घराजवळच आवश्यक बँकिंग सेवांचा लाभ घेणे शक्य होते. टपाल विभागाचा हा उपक्रम विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांसाठी सर्वाधिक लाभदायक ठरला आहे. टपाल विभागाच्या या पुढाकारामुळे डिजिटल परिवर्तनाद्वारे आर्थिक सर्वसमावेशकता सुनिश्चित करण्याच्या सरकारच्या दृष्टिकोनालाही बळकटी मिळत आहे.
या एटीएमच्या माध्यमातून ग्राहक सोयीस्करपणे रोख रक्कम काढू शकतात, खात्यातील शिल्लक तपासू शकतात तसेच इतर मूलभूत बँकिंग व्यवहारही पूर्ण करू शकतात.
नागरिकांनी देशभर उपलब्ध असलेल्या टपाल विभागाच्या या एटीएम सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन टपाल विभागाने केले आहे.
* * *
सुषमा काणे/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2216462)
आगंतुक पटल : 17