रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मौनी अमावस्येनिमित्त भारतीय रेल्वेने 244 विशेष रेल्वेगाड्या चालवल्या, ज्यातून केवळ दोन आठवड्यांत 4.5 लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला


प्रयागराजमध्ये 18 जानेवारी रोजी 40 विशेष गाड्यांनी नियमित सेवांमध्ये कोणताही व्यत्यय न आणता 1 लाख प्रवाशांसाठी सेवा उपलब्ध केली

प्रविष्टि तिथि: 19 JAN 2026 7:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 जानेवारी 2026

भारतीय रेल्वेने मौनी अमावस्येच्या काळात रेल्वे वाहतुकीचे यशस्वीपणे व्यवस्थापन केले असून 3 जानेवारी 2026 पासून देशभरात 244 विशेष रेल्वेगाड्या चालवून भाविकांसाठी सुरळीत आणि सोयीस्कर प्रवासाची खात्री केली. उत्तर रेल्वेवर 31, उत्तर मध्य रेल्वेवर 158 आणि पूर्वोत्तर रेल्वेवर चालवलेल्या 55 अशा विशेष रेल्वेगाड्यांमधून सुमारे 4.5 लाख प्रवाशांनी प्रवास केला. सणासुदीच्या काळात त्रासमुक्त प्रवास आणि सुरक्षित प्रवासाची सोय व्हावी यासाठी या विशेष सेवांचे काळजीपूर्वक नियोजन आणि व्यवस्थापन करण्यात आले होते.

18 जानेवारी रोजी प्रयागराजमध्ये सणासुदीच्या प्रवासाचा उच्चांक दिसून आला, ज्यात उत्तर रेल्वेवर 11, उत्तर मध्य रेल्वेवर 22 तर पूर्वोत्तर रेल्वेवर 7 गाड्यांसह एकूण 40 विशेष गाड्या चालवण्यात आल्या, ज्यातून अंदाजे 1 लाख प्रवाशांनी प्रवास केला. विशेष म्हणजे यावेळी सर्व नियमित गाड्या नियोजित वेळेनुसार धावल्या, जे भारतीय रेल्वेच्या प्रभावी नियोजन आणि कार्यक्षमतेचे द्योतक आहे.

या विशेष गाड्यांचे यशस्वी परिचालन हे सणासुदीच्या गर्दीच्या काळात प्रवाशांना सुरक्षित, सोयीस्कर आणि अखंड सेवा प्रदान करण्याच्या भारतीय रेल्वेच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. मोठ्या प्रमाणावरील प्रवासी वाहतूक कार्यक्षमतेने व्यवस्थापित करण्यासाठी भारतीय रेल्वे ही तंत्रज्ञान, संसाधन नियोजन आणि विविध विभागांमधील समन्वयाचा वापर करत आहे.

सुषमा काणे/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 


(रिलीज़ आईडी: 2216242) आगंतुक पटल : 12
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Odia , Tamil , Kannada