पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

‘विकसित भारत युवा नेते संवाद 2026’ मधील आपल्या भाषणाची पंतप्रधानांनी दिली झलक

प्रविष्टि तिथि: 13 JAN 2026 9:16AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथे आयोजित ‘विकसित भारत युवा नेते संवाद 2026’  मधील आपल्या भाषणाची झलक समाज माध्यमावर दिली.

एक्स वरील आपल्या विविध संदेशांमध्ये मोदी यांनी लिहिले,

गेल्या 11 वर्षांपासून देशातील प्रत्येक क्षेत्रात संधींची असंख्य दारे उघडत आहेत. मजकूर आणि सर्जनशीलतेचा यामध्ये समावेश आहे, जिथे आमचे युवा साथी रामायण आणि महाभारत यांच्या प्रेरणादायी कथांनाही गेमिंग विश्वाचा भाग बनवू शकतात. इतकेच नव्हे; तर आपले हनुमान संपूर्ण जगातील गेमिंग चालवू शकतात!

#YoungLeadersDialogue2026”

आम्ही पुढच्या पिढीतील सुधारणांची जी मालिका सुरू केली आहे, तिने आता सुधारणा एक्सप्रेसचे रूप घेतले आहे. याच्या केंद्रस्थानी आपली युवा शक्तीच आहे.

#YoungLeadersDialogue2026”

गुलामीच्या मानसिकतेतून बाहेर पडून, आपला वारसा आणि आपल्या नवकल्पना नेहमी पुढे ठेवायला हव्यात. स्वामी विवेकानंद यांचे जीवनही आपल्याला हेच शिकवते.

#YoungLeadersDialogue2026”

***

नेहा कुलकर्णी / रेशमा जठार /परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2215796) आगंतुक पटल : 36
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Bengali-TR , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Telugu , Kannada , Malayalam