आयुष मंत्रालय
अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेने आयुर्वेद-आधारित स्टार्टअप्ससाठी एमएसएमई संधींविषयी जागरूकता कार्यक्रमासह राष्ट्रीय स्टार्टअप दिवस 2026 केला साजरा
प्रविष्टि तिथि:
17 JAN 2026 1:10PM by PIB Mumbai
राष्ट्रीय स्टार्टअप दिन २०२६ चे औचित्य साधून अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेने (एआय आय ए) आपल्या ' टीग्रेटेड सेंटर फॉर आयुर्वेदिक इनोव्हेशन अँड एंटरप्रेन्योरशिप' (AIIA–iCAINE) या स्टार्टअप इन्क्युबेशन केंद्राद्वारे नवी दिल्ली येथील आपल्या संकुलात आयुर्वेद-आधारित स्टार्टअप्ससाठी एमएसएमई संधींवरील एक जागरूकता कार्यक्रम यशस्वीरित्या आयोजित केला. हा कार्यक्रम भारत सरकारच्या एमएसएमई–विकास आणि सुविधा कार्यालयाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात धोरणकर्ते, शैक्षणिक क्षेत्रातील नेते, स्टार्टअप्सना सहाय्य करणारे घटक आणि महत्त्वाकांक्षी उद्योजक यांना एकत्र आणण्यात आले, जेणेकरून आयुर्वेद आणि एकात्मिक आरोग्यविषयक नवकल्पनांवर विशेष लक्ष केंद्रित करून एमएसएमई आणि स्टार्टअप परिसंस्थेला बळकट करण्याबाबत विचारमंथन करता आले. या सत्रांमध्ये सरकारी सहाय्य योजना, नाविन्यासाठी संस्थात्मक यंत्रणा, बौद्धिक संपदा संरक्षण, प्रमाणन आणि मानकीकरणाच्या आवश्यकता आणि सुरुवातीच्या टप्प्यातील स्टार्टअप्ससाठी आवश्यक असलेल्या आर्थिक यंत्रणांवर प्रकाश टाकण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. अरुण कुमार यांच्या स्वागतपर भाषणाने झाली, ज्यामध्ये आयुर्वेदातील नवोपक्रम-आधारित उद्योजकतेचा संदर्भ स्पष्ट करण्यात आला. एमएसएमईचे उपसंचालक सुनील कुमार यांनी आयुर्वेद-आधारित उद्योगांसाठी संबंधित एमएसएमई उपक्रम आणि सरकारी योजनांची माहिती दिली. प्रा. मंजुषा राजगोपाला यांनी आयुर्वेद संस्थांमध्ये नावीन्य आणि उद्योजकतेला चालना देण्याबाबत शैक्षणिक आणि संस्थात्मक दृष्टिकोन मांडला.
एमएसएमईचे सहसंचालक डॉ. आर. के. भारती यांनी प्रमुख भाषण केले, ज्यात त्यांनी विशेषत्वाने पारंपरिक औषध आणि आरोग्य क्षेत्रातील स्टार्टअप्स आणि एमएसएमईंना चालना देण्यासाठी एका मजबूत, धोरणात्मक पाठबळ असलेल्या परिसंस्थेची गरज असल्याचे अधोरेखित केले.
तांत्रिक सत्रांमध्ये डीपीआयआयटीच्या माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ संगीता नागर यांनी बौद्धिक संपदा हक्क (आयपीआर) आणि स्टार्टअप्ससाठी त्यांचे महत्त्व यावर, तसेच सिडबीच्या वरिष्ठ व्यवस्थापक ज्योती नीरज यांनी स्टार्टअप्स आणि एमएसएमईसाठी उपलब्ध असलेल्या आर्थिक सहाय्य यंत्रणा आणि निधीच्या संधींवर तज्ञ मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचा समारोप एआयआयए-आयकेनचे सीईओ सुजित एराणेझथ आणि एमएसएमईचे सहाय्यक संचालक नवीन कुमार यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.
या कार्यक्रमाने आयुर्वेदामध्ये रुजलेल्या आणि उद्योजकता, एमएसएमई वाढ आणि शाश्वत आरोग्यसेवा उपायांसाठीच्या राष्ट्रीय प्राधान्यांशी सुसंगत असलेल्या एका मजबूत, नाविन्यपूर्ण स्टार्टअप परिसंस्थेचे संगोपन करण्याच्या AIIA–iCAINE च्या वचनबद्धतेची पुष्टी केली. भारत सरकारच्या एमएसएमई मंत्रालयाद्वारे 'यजमान संस्था' म्हणून मान्यता मिळालेल्या AIIA–iCAINE ने नवकल्पनांचे प्रभावी उद्योगांमध्ये रूपांतर करण्यासाठी एक सुसंघटित व्यासपीठ उपलब्ध करून देऊन नवसंशोधकांना सक्षम करणे सुरू ठेवले आहे.
या राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त, AIIA-iCAINE द्वारे आयुर्वेदात उद्योजकता आणि नवोपक्रमाला चालना देण्याच्या आपल्या समर्पणाचा पुनरुच्चार अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेने केला असून पुराव्यावर आधारित, शाश्वत आणि समावेशक आरोग्य उपायांमध्ये योगदान देणाऱ्या नवीन युगाच्या उपक्रमांना पाठिंबा दिला आहे.



***
नेहा कुलकर्णी / नंदिनी मथुरे/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2215685)
आगंतुक पटल : 25