पंतप्रधान कार्यालय
थिरुवल्लुवर दिनानिमित्त थिरुवल्लुवर यांना पंतप्रधानांनी केले अभिवादन
प्रविष्टि तिथि:
16 JAN 2026 9:24AM by PIB Mumbai
थिरुवल्लुवर दिनानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बहुप्रतिभावान ऋषी थिरुवल्लुवर यांना अभिवादन केले, ज्यांचे कालातीत कार्य आणि आदर्श पिढ्यानपिढ्या असंख्य लोकांना प्रेरणा देत आहेत.
थिरुवल्लुवर यांनी सलोखा आणि करुणेवर आधारित समाजाची संकल्पना मांडली होती, ही मूल्ये आजही अत्यंत सुसंगत आहेत, असे मोदी यांनी नमूद केले. थिरुवल्लुवर हे तमिळ संस्कृतीच्या सर्वोत्तम पैलूंचे प्रतीक आहेत, जे ज्ञान आणि एकतेचा दीपस्तंभ म्हणून उभे आहेत, यावर पंतप्रधानांनी भर दिला.
पंतप्रधानांनी नागरिकांना या संत-कवींच्या सखोल शिकवणीचा अंगिकार करण्याचे आवाहन केले.
'एक्स' वरील स्वतंत्र पोस्टमध्ये मोदी यांनी नमूद केले.
“आज, थिरुवल्लुवर दिनानिमित्त, बहुप्रतिभावान थिरुवल्लुवर यांना अभिवादन करत आहे, ज्यांचे कार्य आणि आदर्श असंख्य लोकांना प्रेरणा देणारे आहे. सलोखा आणि करुणेवर आधारित समाजावर त्यांचा विश्वास होता. ते तमिळ संस्कृतीच्या सर्वोत्तम पैलूंचे प्रतीक आहेत. मी तुम्हा सर्वांना 'तिरुक्कुरल' वाचण्याचे आवाहन करतो, जे महान थिरुवल्लुवर यांच्या असामान्य बुद्धिमत्तेचे दर्शन घडवते.”
“திருவள்ளுவர் தினமான இன்று, ஏராளமான மக்களுக்கு உத்வேகம் அளிக்கும் படைப்புகளையும் சிந்தனைகளையும் கொண்ட பன்முக ஆளுமை திருவள்ளுவருக்கு மரியாதை செலுத்துகிறேன். நல்லிணக்கமும் கருணையும் நிறைந்த ஒரு சமூகத்தின் மீது அவர் நம்பிக்கை வைத்தார். தமிழ்க் கலாச்சாரத்தின் சிறந்த அம்சங்களுக்கு அவர் எடுத்துக்காட்டாகத் திகழ்கிறார். திருவள்ளுவப் பெருந்தகையின் சிறப்பான அறிவாற்றலை வெளிப்படுத்தும் திருக்குறளை நீங்கள் அனைவரும் படிக்க வேண்டும் என்று நான் கேட்டுக்கொள்கிறேன்.”
***
NehaKulkarni/ShileshPatil/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2215193)
आगंतुक पटल : 18
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam