संरक्षण मंत्रालय
भारतीय लष्कराचे अतुलनीय शौर्य, अत्युच्च त्याग आणि अढळ निष्ठेमुळे देशाच्या सार्वभौमत्वाचे, एकात्मतेचे रक्षण होते : लष्कर दिनानिमित्त संरक्षण मंत्र्यांचे प्रतिपादन
आधुनिक, आत्मनिर्भर आणि भविष्यवेधी लष्कराच्या बांधणीसाठी सरकार वचनबद्ध
प्रविष्टि तिथि:
15 JAN 2026 9:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 जानेवारी 2026
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी 15 जानेवारी 2026 रोजी भारतीय लष्कर दिनाच्या अभिमानास्पद प्रसंगी भारतीय लष्कराच्या शूर सेनानी आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत. देशाची एकात्मता व सार्वभौमत्व राखण्यासाठी भारतीय लष्कराचे अतुलनीय शौर्य, अत्युच्च त्याग आणि अढळ निष्ठेबद्दल देश त्यांना अभिवादन करीत आहे, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी एक्स वरील आपल्या संदेशात म्हटले आहे.
देशाच्या सीमांचे सतर्कतेने रक्षण करणारे आणि कोणत्याही आपत्तीच्या प्रसंगी तत्परतेने मदतीस धावून येणारे भारतीय सैन्यदल आपली कार्यक्षमता, शिस्त आणि मानवतेच्या भावनेतून केलेल्या मदतीमुळे जगभरात आदरास पात्र ठरले आहे. भारतीय लष्कराला आधुनिक, आत्मनिर्भर आणि भविष्यवेधी बनवण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे , याचा त्यांनी पुनरुच्चार केला. या शूर सेनानीबद्दल संपूर्ण देशाला अभिमान आणि आदर असून देश त्यांच्या प्रति कृतज्ञ आहे, असे त्यांनी पुढे म्हटले.
सुवर्णा बेडेकर/उमा रायकर /प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2215118)
आगंतुक पटल : 6