पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 जानेवारी रोजी राष्ट्रकुल सभापती आणि पीठासीन अधिकाऱ्यांच्या 28 व्या परिषदेचे करणार उद्घाटन

प्रविष्टि तिथि: 14 JAN 2026 11:19AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10:30 वाजता नवी दिल्ली येथील संसद भवन संकुलातील संविधान सदनाच्या सेंट्रल हॉलमध्ये राष्ट्रकुलमधील सभापती आणि पीठासीन अधिकाऱ्यांच्या 28 व्या परिषदेचे (सीएसपीओसी) उद्घाटन करतील. पंतप्रधान या प्रसंगी उपस्थितांना संबोधितही करणार आहेत.

या परिषदेचे अध्यक्षस्थान लोकसभेचे सभापती ओम बिर्ला भूषवणार असून  जगभरातील 42 राष्ट्रकुल देशांमधील आणि 4 अर्ध-स्वायत्त संसदेतील 61 सभापती आणि पीठासीन अधिकारी  या परिषदेत सहभागी होणार आहेत.

या परिषदेत मजबूत लोकशाही संस्था टिकवून ठेवण्यात सभापती आणि पीठासीन अधिकाऱ्यांची भूमिका, संसदीय कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, संसद सदस्यांवर समाज माध्यमांचा प्रभाव, संसदेबद्दलची सार्वजनिक समज वाढवण्यासाठी आणि मतदानापलीकडे नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी नवोन्मेषी धोरणे यासह विविध समकालीन संसदीय मुद्द्यांवर विचारविनिमय केला जाणार आहे.

***

NehaKulkarni/ShraddhaMukhedkar/DineshYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2214447) आगंतुक पटल : 33
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Assamese , English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Kannada , Malayalam