पंतप्रधान कार्यालय
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या राजनैतिक सल्लागारांनी पंतप्रधानांची भेट घेतली
प्रविष्टि तिथि:
13 JAN 2026 10:52PM by PIB Mumbai
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचे राजनैतिक सल्लागार इमॅन्युएल बोने यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
एक्स माध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये पंतप्रधानांनी लिहिले आहे:
“ फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचे राजनैतिक सल्लागार इमॅन्युएल बोने यांची भेट झाल्याने आनंद झाला.
विविध क्षेत्रातील घनिष्ठ सहकार्याने दृढ आणि विश्वासार्ह झालेल्या भारत आणि फ्रान्स यांच्यातील धोरणात्मक भागीदारीचा यावेळी पुनरुच्चार केला गेला. विशेषतः भारत–फ्रान्स नवोन्मेष वर्ष साजरे करत असताना, नवोन्मेष, तंत्रज्ञान आणि शिक्षण या क्षेत्रांमध्ये आपले सहकार्य विस्तारत असल्याचे पाहणे उत्साहवर्धक आहे. त्यासोबतच महत्वाच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांवर विचारांचे आदानप्रदान झाले. लवकरच भारतभेटीवर येणाऱ्या राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांचे भारतात स्वागत करण्यास उत्सुक आहोत”
@EmmanuelMacron”
***
NehaKulkarni/SampadaPatgaonkar/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2214408)
आगंतुक पटल : 9