संरक्षण मंत्रालय
प्रजासत्ताक दिन 2026: कर्तव्य पथावरील संचलनाच्या रंगीत तालमीसाठी निःशुल्क प्रवेशिका उपलब्ध
प्रविष्टि तिथि:
12 JAN 2026 10:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 जानेवारी 2026
प्रजासत्ताक दिन 2026 च्या निमित्ताने 23 जानेवारी 2026 रोजी कर्तव्य पथावर संचलनाची रंगीत तालीम होणार आहे. ही रंगीत तालीम पाहण्यासाठीच्या निःशुल्क प्रवेशिका 15 जानेवारी ते 16 जानेवारी या कालावधीत विनामूल्य उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या प्रवेशिकांसाठी आमंत्रण www.aamantran.mod.gov.in या संकेतस्थळावरून थेट नोंदणी करता येईल. तसेच Android (Gov.in App Store) आणि iOS App Store वरील Aamantran या मोबाईल ॲपद्वारेही या प्रवेशिका मिळवता येतील. हे ॲप्स खाली दिलेल्या क्यूआर कोडचा वापर करून डाऊनलोड करता येईल.
अँड्रॉइड (Gov.in App Store)

आयओएस ॲप स्टोअर

प्रवेशिका नोंदणी प्रक्रियेचा सविस्तर तपशील खाली नमूद केला आहे:
|
कार्यक्रम
|
प्रवेशिकेचे शुल्क/ नोंदणी |
वेळापत्रक
|
|
प्रजासत्ताक दिन संचलनाची रंगित तालीम (23.01.2026)
|
मोफत (0/- रुपये)
|
15-16 जानेवारी 2026, सकाळी 9 वाजल्यापासून त्या दिवसाचा कोटा संपेपर्यंत
|
प्रजासत्ताक दिन सोहळा 2026 शी संबंधित अधिक माहिती https://rashtraparv.mod.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
निलीमा चितळे/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2213974)
आगंतुक पटल : 27