पंतप्रधान कार्यालय
‘समुद्र प्रताप’ जहाज भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात दाखल झाल्याचे पंतप्रधानांनी केले स्वागत
प्रविष्टि तिथि:
07 JAN 2026 8:54AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘समुद्र प्रताप’ जहाज भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात दाखल होणे हा भारताच्या सागरी प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे असे सांगत त्याचे स्वागत केले. या प्रगत जहाजाचा समावेश अनेक कारणांसाठी उल्लेखनीय आहे असे त्यांनी नमूद केले.
पंतप्रधान म्हणाले की या जहाजाच्या समावेशामुळे संरक्षण आणि सागरी क्षमतेमध्ये भारताच्या आत्मनिर्भर भारताच्या दृष्टिकोनाला अधिक बळ मिळाले आहे. त्यांनी पुढे नमूद केले की यामुळे देशाची सुरक्षा व्यवस्था मजबूत होईल, किनारपट्टीवर दक्षता वाढेल आणि भारताच्या विशाल सागरी हितांचे रक्षण होईल.
यातून शाश्वत विकासाप्रति दृढ वचनबद्धता देखील दिसून येते ज्यात पर्यावरण-स्नेही संचालन सुनिश्चित करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे.
राजनाथ सिंह यांच्या एक्स वरील एका पोस्टला उत्तर देताना मोदी यांनी लिहिले:
“भारतीय तटरक्षक दलाचे जहाज समुद्र प्रताप ताफ्यात दाखल होणे अनेक कारणांसाठी उल्लेखनीय आहे,त्यापैकीच एक म्हणजे हे आत्मनिर्भर भारताच्या दृष्टिकोनाला अधिक बळकटी देते , आपली सुरक्षा व्यवस्था मजबूत करते आणि शाश्वत विकासाप्रति वचनबद्धता दर्शवते.
@IndiaCoastGuard”
***
JaydeviPujariSwami/SushamaKane/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2212001)
आगंतुक पटल : 28
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam