रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन तिमाहीमध्ये भारतीय रेल्वेकडून 80 टक्क्यांहून अधिक भांडवली खर्चाचा वापर


सुरक्षितता, क्षमता वृद्धी, पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण आणि प्रवासी सुविधांवर प्रामुख्याने खर्च

प्रविष्टि तिथि: 05 JAN 2026 7:22PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 जानेवारी 2026

 

भारतीय रेल्वे आधुनिक आणि उत्तम संपर्क या राष्ट्राच्या दृष्टिकोनाला अनुरूप भविष्यासाठी सज्ज अशा संघटनेत स्वतःला रूपांतरित करून देशभरात किफायतशीर दरात जलद, सुरक्षित आणि जागतिक दर्जाचा रेल्वे प्रवास प्रदान करत आहे. हा केंद्रित दृष्टिकोन प्रदर्शित करत भारतीय रेल्वेने 2025-26 साठीच्या  सकल अर्थसंकल्पीय सहाय्य (जीबीएस) खर्चाच्या वापराबाबत एक मजबूत कल कायम  राखला आहे.

डिसेंबर 2025 अखेर, भारतीय रेल्वेने एकूण 2,52,200 कोटी रुपयांच्या जीबीएसपैकी 80.54 टक्के म्हणजेच 2,03,138 कोटी रुपये खर्च केले आहेत. गेल्या वर्षीच्या (डिसेंबर 2024) याच कालावधीच्या तुलनेत जीबीएस वापरात 6.54 टक्के वाढ झाली आहे. हा खर्च प्रामुख्याने सुरक्षा उपाययोजना, क्षमता वृद्धी, पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण आणि प्रवासी सुविधांवर केंद्रित आहे.

सुरक्षेशी संबंधित कामांच्या श्रेणीमध्ये, वितरित निधीपैकी 84 टक्के निधी वापरण्यात आला आहे. ग्राहक सुविधांसाठी 80 टक्के वापर झाला असून, डिसेंबर 2025 पर्यंत 9,575 कोटी रुपये खर्च झाला आहे.

गेल्या दशकात सातत्यपूर्ण भांडवली खर्चाचे (कॅपेक्स) परिणाम व्यापक कामांमध्ये दिसून येतात, ज्यात  164 वंदे भारत रेल्वे सेवा, 30 अमृत भारत रेल्वे  सेवा, कवच स्वयंचलित रेल्वे  संरक्षण प्रणालीची अंमलबजावणी, ब्रॉडगेज नेटवर्कचे 99 टक्क्यांहून अधिक विद्युतीकरण आणि नवीन मार्ग, गेज रूपांतरण, ट्रॅकचे दुपदरीकरण, वाहतूक सुविधा, सार्वजनिक उपक्रमांमधील गुंतवणूक आणि महानगरीय वाहतूक व्यवस्था यांचा समावेश आहे. या उपक्रमांमुळे वेग, सुरक्षितता आणि प्रवाशांच्या सोयींमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे,तसेच  रेल्वे प्रवास किफायतशीर राहिला आहे.  वंदे भारत स्लीपर रेल्वेगाडीचे लवकरच उद्घाटन होणार असून भारतीय  रेल्वे लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासात परिवर्तन घडवून आणण्यास सज्ज आहे.

यावरून  सूचित होते की रेल्वे मंत्रालयाचे जीबीएस खर्च नियोजन  योग्य दिशेने सुरू आहे, पायाभूत सुविधांची कामे जलदगतीने हाती घेतली  जात आहेत. यातून हे देखील सूचित होते  की आर्थिक वर्ष 2025-26 साठी ठरवलेली उद्दिष्टे  पूर्णपणे साध्य होण्याची शक्यता आहे.

 

* * *

निलिमा चितळे/सुषमा काणे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2211610) आगंतुक पटल : 19
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Odia , Tamil , Kannada , Malayalam