रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
राह-वीर: निर्भयपणे जीव वाचवा -अपघातग्रस्त व्यक्तींना मदत करणाऱ्या व्यक्तीला दिले जाणारे संरक्षण सुनिश्चित करते की तुम्हाला कोणत्याही गोष्टीची चिंता करण्याची गरज नाही
प्रविष्टि तिथि:
04 JAN 2026 2:17PM by PIB Mumbai
रस्ते अपघाताच्या वेळी प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो, विशेषतः महत्वपूर्ण 'गोल्डन अवर'मध्ये , जेव्हा वेळेवर मिळालेली मदत एखाद्याचा जीव वाचवू शकते. अशा क्षणी पुढे येणाऱ्या नागरिकांचे समर्थन तसेच त्यांचे संरक्षण करण्यासाठी, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 2020 मध्ये मोटार वाहन (सुधारणा) अधिनियम, 2019 च्या कलम 134A अंतर्गत 'गुड समॅरिटन ' नियम अधिसूचित केले. हे नियम एका साध्या विश्वासावर आधारित आहेत - अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या कोणालाही असे करताना भीती वाटू नये. जखमी अनोळखी व्यक्तीला उचलून जवळच्या रुग्णालयात पोहोचवण्यासाठी धाडसाने पुढे येणाऱ्या लोकांना 'राह-वीर' म्हटले जाते, अनेकदा जखमींचे नावही माहीत नसतानाही ते मदत करतात.
गोल्डन अवरमध्ये जीव वाचवणे
कायद्यानुसार 'गोल्डन अवर'ची व्याख्या गंभीर दुखापतीनंतरचा पहिला तास अशी केली जाते. हा काळ वैद्यकीय उपचारांसाठी सर्वात महत्त्वाचा असतो. या काळात मिळालेली त्वरित मदत आयुष्यभराचे अपंगत्व, आघात आणि असंख्य मृत्यू टाळू शकते.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, 'राह-वीर' बनण्यासाठी तुम्हाला वैद्यकीय प्रशिक्षणाची गरज नाही. तुम्हाला विशिष्ट उपकरणांची देखील गरज नाही. कधीकधी, तुमची मदत करण्याची इच्छा हीच सर्वात मोठी मदत असते.

उत्तम रस्ते आणि वाढत्या पायाभूत सुविधा असूनही, भारतात रस्ते अपघातातील जखमी आणि मृतांच्या संख्येत चिंताजनक वाढ होत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नमूद केल्याप्रमाणे, या अपघातांचा आर्थिक परिणामही मोठा असून यामुळे देशाचे जीडीपीच्या जवळपास 3% नुकसान होत असल्याचे आयआयटी दिल्लीच्या अहवालात अधोरेखित केले आहे.
राह-वीरांसाठी सन्मान आणि वित्तीय सहाय्य
'राह-वीर' (गुड समारिटन) योजना अशा व्यक्तींना आर्थिक सन्मान देत असून या व्यक्तींना वास्तविक जीवनातील नायक म्हणून गौरवते, ज्यांनी संकोचाऐवजी करुणेची निवड केली.
या योजनेंतर्गत, जो कोणी अपघातग्रस्ताला गोल्डन अवरमध्ये वैद्यकीय मदत मिळवून देतो, तो 25,000 रुपयांचे बक्षीस आणि प्रशंसापत्रासाठी पात्र असतो, आणि वारंवार असे धाडस दाखवल्यास वर्षातून जास्तीत जास्त पाच वेळा हा सन्मान मिळू शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ही योजना आत्मविश्वास, भरवसा आणि अशी संस्कृती निर्माण करते जिथे रस्त्यावर इतरांना मदत करणे ही एक सामूहिक जबाबदारी आणि राष्ट्रासाठी अभिमानाची बाब बनते .
'राह-वीर' ही केवळ एक योजना किंवा धोरण नाही - ती साहस , सहानुभूती आणि सामूहिक जबाबदारी आहे.

***
सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2211255)
आगंतुक पटल : 44