गृह मंत्रालय
स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या आणि समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी वाहिली आदरांजली
सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाच्या मूलभूत अधिकाराशी जोडून महिला सक्षमीकरणाला एक नवी दिशा दिली
सावित्रीबाई फुले यांनी अनिष्ट सामाजिक प्रथांविरुद्ध लढा दिला, देशातील मुलींची पहिली शाळा स्थापन केली आणि समाजसुधारणेची ज्योत प्रज्वलित केली
सावित्रीबाई फुले यांचे प्रेरणादायी जीवन राष्ट्र उभारणीत नेहमीच दीपस्तंभ म्हणून मार्गदर्शक ठरेल
प्रविष्टि तिथि:
03 JAN 2026 11:31AM by PIB Mumbai
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या आणि थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आज आदरांजली अर्पण वाहिली आहे.
यासंदर्भात अमित शाह यांनी X या समाजमाध्यमावर संदेश सामायिक केला आहे. सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाच्या मूलभूत अधिकाराशी जोडून महिला सक्षमीकरणाला एक नवी दिशा दिली असल्याचे अमित शाह यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
सावित्रीबाईंनी अनिष्ट सामाजिक प्रथांविरुद्ध मोठा लढा दिला, देशातील मुलींची पहिली शाळा स्थापन केली आणि समाजात सुधारणेची ज्योत प्रज्वलित केली, असेही त्यांनी म्हटले. सावित्रीबाई फुले यांचे प्रेरणादायी जीवन राष्ट्र उभारणीच्या कार्यात नेहमीच एक दीपस्तंभ म्हणून मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला आहे.
***
हर्षल अकुडे/तुषार पवार/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2211023)
आगंतुक पटल : 20
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam