वस्त्रोद्योग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वस्त्रोद्योगासाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन (पीएलआय) योजना : नवीन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख सरकारने 31 मार्च 2026 पर्यंत वाढवली

प्रविष्टि तिथि: 02 JAN 2026 5:23PM by PIB Mumbai

 

वस्त्रोद्योगासाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन (पीएलआय) योजनेसाठी नवीन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख केंद्र सरकारने 31 मार्च 2026 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑगस्ट 2025 मध्ये अर्ज पोर्टल पुन्हा सुरू झाल्यानंतर मिळालेल्या मोठ्या प्रतिसादामुळे सरकारने ही मुदतवाढ केली आहे. वस्त्रोद्योग कंपन्यांनी मानवनिर्मित तंतू (एमएमएएफ) वस्त्र, एमएमएफ कापड आणि तांत्रिक वस्त्र या प्राधान्य क्षेत्रांमध्ये प्रस्ताव सादर केले आहेत.

या निर्णयामुळे भारताच्या वस्त्रोद्योग क्षेत्रातील गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास अधिक मजबूत झाला आहे. सरकारने पात्र अर्जदारांना जास्त वेळ दिल्यामुळे अधिक कंपन्या या योजनेत सहभागी होऊ शकतील, हा मुदतवाढीचा मुख्य उद्देश आहे.

https://pli.texmin.gov.in/  हे अर्ज पोर्टल  31.03.2026 पर्यंत खुले राहील.

***

शैलेश पाटील/प्रज्ञा जांभेकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2210900) आगंतुक पटल : 20
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Malayalam