पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दृढनिश्चय आणि इच्छाशक्तीचे माहात्म्य सांगणारे सुभाषित सामायिक केले.
प्रविष्टि तिथि:
02 JAN 2026 9:43AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या असून येणाऱ्या काळात प्रत्येक व्यक्तीला आपल्या कार्यात यश मिळो अशी मनोकामना व्यक्त केली आहे.
दृढनिशचय आणि इच्छाशक्तीच्या बळावर नवीन वर्षानिमित्त केलेले संकल्प पूर्ण होतील यावर त्यांनी भर दिला आहे.
कालातीत असणारी ही ज्ञानगंगा आपल्याला अधिक जोमाने कार्य करण्यास सदैव जागृत राहण्यास आणि क्षेमकल्याणकारी कृती करण्यास प्रवृत्त करतानाच भविष्याकडे मार्गक्रमण करताना आपले चित्त शांत आणि निर्भय ठेवते, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
हा प्रेरणादायी संदेश देत पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये एक संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे.
"येणाऱ्या वर्षामध्ये तुमच्या सर्व प्रयत्नांना यश मिळो अशी मी शुभेच्छा देतो. नवीन वर्षात तुमचा दृढनिश्चय आणि इच्छाशक्ती तुमचे संकल्प पूर्ण करो."
उत्थातव्यं जागृतव्यं योक्तव्यं भूतिकर्मसु।
भविष्यतीत्येव मनः कृत्वा सततमव्यथैः।।”
***
NehaKulkarni/BhaktiSontakke/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2210716)
आगंतुक पटल : 14
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam