रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची मोठी घोषणा, 1 फेब्रुवारी 2026 नंतर जारी करण्यात येणाऱ्या नव्या फास्टॅगसाठी कारवरील ‘नो युवर व्हेईकल’ प्रक्रिया बंद करण्याचा निर्णय
प्रविष्टि तिथि:
01 JAN 2026 8:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 जानेवारी 2026
महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना फास्टॅग सक्रिय केल्यानंतर भेडसावणाऱ्या त्रासाला आळा घालण्यासाठी आणि सार्वजनिक सोयीसुविधा वाढविण्याच्या दृष्टीने मोठे पाऊल उचलत, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 1 फेब्रुवारी 2026 पासून सर्व नव्या फास्टॅग जारीकरणासाठी (कार / जीप / व्हॅन श्रेणीतील फास्टॅग) ‘नो युवर व्हेईकल’ प्रक्रिया बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. वैध वाहन कागदपत्रे असूनही फास्टॅग जारी झाल्यानंतर नो युवर व्हेईकल प्रक्रियेच्या अटींमुळे अडचणी आणि विलंबाचा सामना करावा लागत असलेल्या लाखो सामान्य रस्ते वापरकर्त्यांना या सुधारणेमुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
कारसाठी आधीच जारी करण्यात आलेल्या विद्यमान फास्टॅगच्या बाबतीत नो युवर व्हेईकल’ प्रक्रिया आता नियमितपणे अनिवार्य राहणार नाही. मात्र, सैल फास्टॅग, चुकीचे जारीकरण किंवा गैरवापराशी संबंधित तक्रारी प्राप्त झाल्यासच विशिष्ट प्रकरणांमध्ये नो युवर व्हेईकल’ करण्यात येईल. कोणतीही तक्रार नसल्यास विद्यमान कार फास्टॅगसाठी नो युवर व्हेईकलची आवश्यकता नसेल.
फास्टॅग सक्रियतेपूर्वी कडक उपाययोजना
वापरकर्त्यांसाठी प्रक्रिया सुलभ करताना अचूकता, नियमांचे पालन आणि प्रणालीची अखंडता कायम राहावी, या उद्देशाने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जारीकर्ता बँकांसाठी फास्टॅग सक्रियतेपूर्वीचे पडताळणी निकष अधिक सक्षम केले आहेत.
- वाहन अॅप -आधारित अनिवार्य पडताळणी: फास्टॅग सक्रिय करण्यापूर्वी वाहनाची माहिती वाहन डेटाबेसमधून पडताळली जाणार आहे.
- सक्रियतेनंतर पडताळणी रद्द: याआधी अस्तित्वात असलेली फास्टॅग सक्रिय केल्यानंतर पडताळणी करण्याची तरतूद रद्द करण्यात आली आहे.
- नोंदणी प्रमाणपत्र - आधारित पडताळणी (अपवादात्मक प्रकरणात): वाहन ऍपमध्ये वाहन माहिती उपलब्ध नसल्यास जारीकर्ता बँक आरसी वापरून पडताळणी करेल.
- ऑनलाइन फास्टॅगसाठी सुसंगत पडताळणी: ऑनलाइन माध्यमातून विकले जाणारे फास्टॅग बँक पडताळणी पूर्ण केल्यानंतरच सुरू होऊ शकतील.
या उपाययोजनांमुळे सर्व वाहन पडताळणी पूर्ण होईल आणि फास्टॅग सक्रियतेनंतर ग्राहकांकडे वारंवार चौकशी करण्याची आवश्यकता राहणार नाही.
या सुधारणांमुळे फास्टॅग यंत्रणा सर्वसामान्यांसाठी सोयीस्कर, पारदर्शक आणि तंत्रज्ञान-आधारित करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची सातत्यपूर्ण वचनबद्धता प्रतिबिंबित होते, तसेच नियमांचे पालन सक्षम होऊन तक्रारी कमी केल्या जातील. सक्रियतेपूर्वी पडताळणीची जबाबदारी पूर्णपणे जारीकर्ता बँकांकडे सोपवून, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा महामार्ग वापरकर्त्यांना सुलभ आणि त्रासमुक्त अनुभव देण्याचा उद्देश आहे.
* * *
शैलेश पाटील/राज दळेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2210640)
आगंतुक पटल : 9