सांस्कृतिक मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 जानेवारी 2026 रोजी पिप्राहवा पवित्र अवशेषांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करणार
“लोटस लाईट: रिलिक्स ऑफ द अवेकन्ड वन” मध्ये मायदेशी परत आणलेले अवशेष आणि संबंधित पुरातन वस्तूंचे प्रदर्शन केले जाईल
प्रविष्टि तिथि:
31 DEC 2025 6:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 डिसेंबर 2025
केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय “लोटस लाईट: रिलिक्स ऑफ द अवेकन्ड वन” या नावाचे एक ऐतिहासिक सांस्कृतिक प्रदर्शन आयोजित करणार आहे. यामध्ये पूजनीय पवित्र पिपराहवा अवशेषांसह महत्त्वपूर्ण संबंधित पुरातन वस्तूंचे प्रदर्शन केले जाईल. हे प्रदर्शन बुद्धांच्या शिकवणीशी असलेला भारताचा चिरंतन सांस्कृतिक संबंध आणि आपल्या समृद्ध आध्यात्मिक वारशाचे जतन आणि प्रदर्शन करण्याप्रति असलेली वचनबद्धता अधोरेखित करत आहे.
या प्रतिष्ठेच्या प्रदर्शनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवार, 3 जानेवारी 2026 रोजी राय पिथोरा सांस्कृतिक संकुल, नवी दिल्ली येथे होईल. हा कार्यक्रम भारताच्या सांस्कृतिक आणि राजनैतिक इतिहासातील एक महत्त्वाचा क्षण आहे, कारण प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या अवशेषांमध्ये मायदेशी परत आणलेल्या अशा पवित्र अवशेषांचा समावेश आहे ज्यांना जगभरातील बौद्ध समुदायांमध्ये प्रचंड ऐतिहासिक, पुरातत्व आणि आध्यात्मिक महत्त्व आहे.
19 व्या शतकाच्या उत्तरार्धात शोधले गेलेले अवशेष हे गौतम बुद्धांच्या पार्थिवाशी संबंधित असल्याचे मानले जाते, जे शाक्य वंशाने जतन केले होते. त्यांना मायदेशी परत आणणे आणि त्यांचे सार्वजनिक प्रदर्शन हे भारताचा सांस्कृतिक वारसा जपण्याचे आणि बुद्धांच्या शिकवणीत असलेल्या शांतता, करुणा आणि प्रबोधनाच्या वैश्विक मूल्यांचा प्रसार करण्याच्या भारताच्या निरंतर प्रयत्नांचे प्रतिबिंब आहे.
प्रदर्शनाची वैशिष्ट्ये:
- अवशेष आणि संबंधित पुरातन वस्तूपवित्र पिप्राहवा
- ऐतिहासिक, आध्यात्मिक आणि पुरातत्व संदर्भ अधोरेखित करणारी विशेष रचनाकृत प्रदर्शने
- विद्वान, भाविक आणि सामान्य जनता या सर्वांसाठी विचारपूर्वक तयार केलेला प्रदर्शनाचा अनुभव
* * *
निलिमा चितळे/शैलेश पाटील/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2210245)
आगंतुक पटल : 10