उपराष्ट्रपती कार्यालय
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी रामेश्वरम येथे काशी तमिळ संगमम् 4.0 च्या समारोप समारंभाला केले संबोधित
प्रविष्टि तिथि:
30 DEC 2025 9:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 डिसेंबर 2025
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज रामेश्वरमच्या पावन भूमीत आयोजित काशी तमिळ संगमम् 4.0 च्या समारोप समारंभाला संबोधित केले. हा उपक्रम म्हणजे भारताच्या कालातीत आध्यात्मिक आणि सांस्कृतिक एकतेचे एक जिवंत प्रतीक आहे असे वर्णन त्यांनी केले.
काशी आणि तमिळनाडू यांच्यातील दीर्घकालीन नातेसंबंध अधोरेखित करताना उपराष्ट्रपती म्हणाले की हा संबंध केवळ ऐतिहासिक नसून तो हजारो वर्षांपासून भारताला एकत्र बांधून ठेवणारा गहन सांस्कृतिक आणि आध्यात्मिक नागरी वारसा आहे. अशा प्रकारच्या देवाणघेवाणीमुळे भारताचा सामायिक वारसा दृढ होतो आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक घट्ट होते, असे त्यांनी नमूद केले.
महाकवी सुब्रमण्यम् भारती यांचा संदर्भ देत उपराष्ट्रपतींनी सांगितले की, काशी तामिळ संगमम् हे एका एकसंध, एकात्म आणि आत्मविश्वासपूर्ण भारताच्या कवीच्या दृष्टिकोनाचे प्रतिबिंब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि केंद्रित प्रयत्नांमुळे भारती यांचे स्वप्न आज साकार होत आहे, असे ते म्हणाले.
पंतप्रधानांच्या 'एक भारत, श्रेष्ठ भारत' या संकल्पनेवर जोर देत उपराष्ट्रपती म्हणाले की, काशी-तामिळ संगमम् सारखे उपक्रम सांस्कृतिक देवाणघेवाण, सामायिक वारसा आणि परस्पर आदराद्वारे राष्ट्रीय एकात्मता अधिक मजबूत करतात. अशा प्रयत्नांमुळे देश ‘विकसित भारत’ या ध्येयाकडे सातत्याने वाटचाल करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
या समारोप समारंभाला तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी; केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान; केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि संसदीय कार्य राज्यमंत्री एल. मुरुगन; आमदार नैनार नागेंद्रन; भारतीय तंत्रज्ञान संस्था मद्रासचे संचालक प्रा. व्ही. कामकोटी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
* * *
निलिमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2209965)
आगंतुक पटल : 5