पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राचीन भारतीय शिवण-जहाज तंत्रज्ञानाचा वापर करून बांधलेल्या आणि पोरबंदरहून ओमानमधल्या मस्कतसाठी आपल्या पहिल्या सागरी प्रवासाला निघालेल्या आयएनएसव्ही कौंडिण्यची केली प्रशंसा

प्रविष्टि तिथि: 29 DEC 2025 7:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 डिसेंबर 2025

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पहिल्या सागरी प्रवासासाठी पोरबंदरहून ओमानमधल्या मस्कतकडे निघालेल्या आयएनएसव्ही कौंडिण्यचे तसेच या जहाजाच्या निर्मितीसाठी केलेल्या समर्पित प्रयत्नांबद्दल डिझाइनर, कारागीर, जहाज निर्माते आणि भारतीय नौदलाचे अभिनंदन केले आहे. आयएनएसव्ही कौंडिण्य हे प्राचीन भारतीय शिवण-जहाज तंत्रज्ञानाचा वापर करून बांधले गेले आहे, जे भारताच्या समृद्ध सागरी परंपरा अधोरेखित करते, असे पंतप्रधान म्हणाले. "आखाती प्रदेश आणि त्यापलीकडील देशांशी असलेले आपले ऐतिहासिक संबंध पुन्हा प्रस्थापित करत असलेल्या या प्रवासासाठी मी जहाजावरील कर्मचाऱ्यांना सुरक्षित आणि अविस्मरणीय प्रवासासाठी शुभेच्छा देतो," असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटले आहे:

"आयएनएसव्ही कौंडिण्य आपल्या पहिल्या सागरी प्रवासासाठी पोरबंदरहून ओमानमधल्या मस्कतकडे

निघत असल्याचे पाहून आनंद झाला. प्राचीन भारतीय शिवण-जहाज तंत्रज्ञानाचा वापर करून बांधलेले हे जहाज भारताच्या समृद्ध सागरी परंपरा अधोरेखित करते. या अद्वितीय जहाजाला साकार करण्यासाठी केलेल्या समर्पित प्रयत्नांबद्दल मी डिझाइनर, कारागीर, जहाज निर्माते आणि भारतीय नौदलाचे अभिनंदन करतो. आखाती प्रदेश आणि त्यापलीकडील देशांशी असलेले आपले ऐतिहासिक संबंध पुन्हा प्रस्थापित करत असलेल्या या प्रवासासाठी मी जहाजावरील कर्मचाऱ्यांना सुरक्षित आणि अविस्मरणीय प्रवासासाठी शुभेच्छा देतो."

@INSVKaundinya

 

 

* * *

निलिमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे


(रिलीज़ आईडी: 2209551) आगंतुक पटल : 18
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Telugu , Kannada , Malayalam