पंतप्रधान कार्यालय
बिस्वा बंधू सेन जी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
प्रविष्टि तिथि:
26 DEC 2025 12:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 डिसेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिपुरा विधानसभेचे अध्यक्ष बिस्वा बंधू सेन जी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्रिपुराच्या प्रगतीस चालना देण्यासाठी केलेल्या त्यांच्या प्रयत्नांसाठी तसेच विविध सामाजिक कार्यांप्रती असलेल्या त्यांच्या बांधिलकीसाठी ते कायम स्मरणात राहतील, असे मोदी यांनी म्हटले आहे.
एक्स वर केलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले की,
"त्रिपुरा विधानसभेचे अध्यक्ष बिस्वा बंधू सेन जी यांच्या निधनामुळे तीव्र दुःख झाले आहे. त्रिपुराच्या प्रगतीस चालना देण्याकरता त्यांनी केलेल्या प्रयत्नांसाठी तसेच विविध सामाजिक कार्यांप्रती असलेल्या त्यांच्या बांधिलकीसाठी ते कायम स्मरणात राहतील. या दुःखद प्रसंगी त्यांचे कुटुंबीय आणि प्रियजनांप्रति संवेदना व्यक्त करतो. ओम शांती."
* * *
नेहा कुलकर्णी/राज दळेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2208763)
आगंतुक पटल : 9