पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी ‘सदैव अटल’येथे अटलबिहारी वाजपेयीजींना वाहिली श्रद्धांजली
Posted On:
25 DEC 2025 12:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 डिसेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस्थळ 'सदैव अटल' येथे श्रद्धांजली वाहिली. अटलजींचे जीवन जनसेवा व राष्ट्रसेवेसाठी समर्पित होते; त्यांचे विचार नेहमीच देशातील जनतेला प्रेरणा देत राहतील, असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
"माजी पंतप्रधान, आदरणीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त, आज दिल्लीतील त्यांच्या 'सदैव अटल' स्मारकाला आदरांजली वाहण्याचे सौभाग्य मला मिळाले. सार्वजनिक सेवा आणि राष्ट्रसेवेसाठी समर्पित त्यांचे जीवन देशवासीयांना नेहमीच प्रेरणा देईल."
* * *
शिल्पा नीलकंठ/हेमांगी कुलकर्णी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2208424)
अभ्यागत कक्ष : 43
Read this releasein:
Malayalam
,
Manipuri
,
Assamese
,
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu